*संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा अन्‍यथा* *मागण्या मान्य न झाल्यास लाभार्थी यांचेसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा : तानाजी जाधव*

*संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा अन्‍यथा* *मागण्या मान्य न झाल्यास लाभार्थी यांचेसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा : तानाजी जाधव*


प्रतिनिधी दि.25  *राज्य शासनाच्या निराधार, अंध, अपंग, शाररीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतून राज्य पुरुस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा  राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात  सदर योजनेतील लाभार्थी यांना मिळणारे अर्थसहाय्य हे तुंटपुंजे असून सध्याच्या महागाईच्या काळात त्याना उदरनिर्वाह करणे अडचणीचे होत आहे. तरी येणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात लाभार्थी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली असून निवेदनाची प्रत पंढरपूर तहसिलदार यांचेकडे श्रावणबाळ माता पिता सेवा सामाजिक संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिली.*     

यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र मांढरे, पंढरपूर शहर अध्यक्ष प्रविण लिमकर, कार्याध्यक्ष हरिभाऊ मुजमुले, उपाध्यक्ष विराज पाटील, समाजसेवक हणमंत मोरे, खेडभाळवणीचे सरपंच मचिंद्र पवार उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतून राज्य पुरुस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा  राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात तसेच केंद्र पुरुस्कृत दारिद्रेरेषेखाली वृध्द व्यक्तीकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना विधवा व दिव्यांग व्यक्तीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत रु.11,00/- व रु.1,200/-  व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थ सहाय्यात रु.1,000/- वाढ करणेत करण्यात आलेली आहे. राज्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांची संख्या मोठया प्रमाणात असून यांना मिळणारे अर्थसहाय्य हे तुंटपुंजे आहे. सध्याच्या महागाईच्या काळात त्याना उदरनिर्वाह करणे अडचणीचे होत आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात लाभार्थी यांच्या खालील प्रमुख मागण्यांची सोडवणूक करुन हा प्रश्न निकाली काढण्यात यावा.  

*1) संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा वृध्द निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट रु.2,000/- अनुदानात वाढ करण्यात यावी. 2) राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत जिच्या पतीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यु झाला अशा तरुण विधवेला सध्या रु.20,000/- (अक्षरी, वीस हजार रुपये.) इतकी रक्कम देण्यात येते मात्र त्यासाठी  मयताची अथवा कुटुंब प्रमुखाचे दारिद्रेरेषेखालील यादीत नांव असणे बंधनकारक आहे ती अट रदद करुन मदतीची रक्क्म वाढवून रु.1,00,000/- (अक्षरी, एक लाख रु.) इतकी मदत तातडीने देण्यात यावी.3) श्रावण बाळ योजनेतील वृध्द नागरीकांची वयाची अट 65 वर्षे वरुन वय वर्षे 60 करण्यात यावी. 4) शासनाने फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना उत्पन्नाची अट रु.50,000/- केलेली आहे इतर लाभार्थ्यांना उत्पन्नाची रु.21,000/- इतकी आहे. ती अट रदद करुन दिव्यांगा प्रमाणे रु.50,000/- करण्यात यावी. 5) योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी दिपावली भेट म्हणून स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य मिळावे शी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामान्य प्रशासन विभाग मंत्री धनंजय मुंडे,  विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, खा.नवनीतताई राणा, आमदार रविभाऊ राणा, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.* वरील मागण्यांची शासन दरबारी सोडवणूक न झाल्यास मागण्या मान्य होईपर्यंत पंढरपूर येथील तहसिल कार्यालय समोरजिल्हयातील लाभार्थी यांचेसह उपोषण करण्यात येईल त्याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहिल याची नोंद घेण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.