*मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थोपटली दिलीप धोत्रे ची पाठ* *दिलीप धोत्रे च्या कार्यअहवालाचे प्रकाशन*
पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या नवीन निवस्थानी करण्यात आले, यावेळी मनसे चे सर्व नेते, सरचिटणीस, महिला पदाधिकारी उपस्थित होते,,
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी कोरोनाच्या काळामध्ये हजारो कुटुंबाना मदत केली, अनेक गराजूना जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य, मास्क, सानिटायझर,मास्क, पीपीइ किट, इत्यादींचे वाटप केले ही सेवा कायम चालू होती,,अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना मदत केली, पंढरपूर येथे पल्स कोविड हॉस्पिटल चालू करून गरीब रुग्णांना मदत केली,,
कोरोनाच्या संकट काळात सर्वच जण अडचणीत असताना महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या गुंडाकडून वसुलीसाठी त्रास दिला जात होता, हा त्रास बंद करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर मनसेच्या वतीने धोत्रे यांनी हजारो महिलांचे मोर्चे काढून महिलांना न्याय दिला.
मनसेच्या नेतेपदी निवड होऊन शंभर दिवस पूर्ण झाले, या शंभर दिवसांमध्ये संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र भर पायाला भिंगरी असल्यासारखे दौरे करून मेळावे ,मोर्चे ,आंदोलने, शाखा उदघाटन करून ग्रामीण महाराष्ट्रात मनसेमय वातावरण केले. गाव तिथे कार्यकर्ता घर तिथे शाखा हा कार्यक्रम राबउन नवचैतन्य निर्माण केले,
या सर्व कार्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करून त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाबासकी ची थाप देऊन, चांगले काम करणाऱ्यांचा कायम सन्मान करण्यात येईल असे म्हणून दिलीप धोत्रे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, यावेळी मनसे नेते सर्वश्री बाळा नांदगावकर, अमित ठाकरे,अनिल शिदोरे, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर,माजी आमदार नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,बाबू वागस्कर, अभिजित पानसे, संजय चित्रे,माजी आमदार,जयप्रकाश बाविस्कर ,सर्व प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे,माजी आमदार प्रकाश भोईर, माजी आमदार परशुराम उपरकर,हेमंत गडकरी, मनोज चव्हाण, संजय नाईक, नयन कदम, किशोर शिंदे, वसंत मोरे,हेमंत संभुस,अजय शिंदे,अविनाश जाधव, शालिनीताई ठाकरे, रिटा गुप्ता, स्नेहल जाधव, सुप्रिया दळवी, अनिषा माजगावकर, इत्यादी उपस्थित होते,,