*करकंब येथे आज अभिजीत पाटील यांची तोफ धडाडणार....!* *करकंब येथील सभेत मिळणार सर्व आरोपाची उत्तरे* *या सभेकडे तालुक्यातून लागून राहिलेले लक्ष्.*
करकंब /प्रतिनिधी:
-संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्याचे विशेष म्हणजे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या निवडणुकीच्या अनुषंगाने अभिजीत उर्फ आबा पाटील यांनी या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक आपली वेगळीच क्रेझ निर्माण करीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाच्या मनामध्ये आगळे वेगळे स्थान निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्मवीर माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांच्या तत्वाने लवकरात लवकर सुरू करून या पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी... असलेल्या विठ्ठल च्या सभासदांना कामगारांना पुन्हा एकदा निर्माण आशा पल्लवीत झाल्याने अनेक सभासदांनी आबांच्या अर्जासाठी साकडे घातले होते... आणि या विठ्ठल च्या स्वाभिमानी ....सभासद व कामगारांच्या भावनिक ते ला साद घालून चक्क पांडुरंग पावला.... आणि आबा उर्फ अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलचा स्वाभिमानी.... सभासद.. कामगार वर्ग आणि तालुक्यातील जेष्ठ, तरुण वर्ग , शेतकरी संघटना यांच्या बरोबरीने जोरात रणसिंग फुंकले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत उर्फ आबा पाटील तसेच युवराज दादा पाटील, गणेश दादा पाटील आणि दीपक दादा पवार आणि भगीरथ दादा भालके, कल्याणराव काळे हे सर्व गट एकमेकांच्या या निवडणुकीच्या रणांगणात निवडणूक लढवीत असून या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करकंब येथे पहिल्यांदाच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची बैठक अभिजीत उर्फ आबा पाटील यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून करकंब ही पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जायची. पण एकमेकांचे पाय खेचण्यात या राजधानीला ज्यांनी त्यांनी आपल्या घरात खेचण्याचा प्रयत्न केल्याने वारंवार पणे संचालक पदाने
हुलकावणी दिली. सध्या श्री विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निमित्ताने यंदा तरी करकंब ला विठ्ठल पावणार का...? या प्रतीक्षेत करकंब सह या गटातील स्वाभिमानी सभासद कामगार वर्ग आणि सर्वसामान्य लोकांतून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसात श्री विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अभिजित ऊर्फ आबा पाटील यांनी सभासद बैठका च्या निमित्ताने तालुक्यात धुरळा उडवून दिला असून अभिजीत उर्फ आबा पाटील यांची एक वेगळी क्रेझ निर्माण झाल्याने करकंब येथील या सभेकडे विशेष लक्ष लागून राहिले असल्याने आबा उर्फ अभिजीत पाटील यांच्या पॅनल मधून संचालक म्हणून उमेदवार कोण...? याची उत्सुकता करकंब सह ग्रामीण भागातील सभासदास सह लोकांना लागून राहिली आहे.