* करकंब मध्ये पांडुरंग परिवाराचा वारसदार कोण.... ग्रामपंचायत मध्ये निवडून आले शिलेदार दोन......!* *अरेरे .. यंदाही पांडुरंग पावला नाही*
करकंब/ प्रतिनिधी
: पंढरपूर तालुक्याची अध्यात्मिक त्यातच विशेषता राजकीय राजधानी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून करकंब हे हे गाव सर्व परिचित आहे. अगदी कर्मयोगी श्रीमंतयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांनी पांडुरंग परिवाराची धुरा सांभाळत असताना तसेच पंढरपूर तालुक्याचे विकासात्मक राजकारण ,अर्थकारण, समाजकारणात त्या काळात गटातटाचे राजकारण असतानाही पांडुरंग परिवार मात्र एकसंघ एकनिष्ठ एक तत्वी ठेवण्याचे काम केले, त्याच धर्तीवर माजी आमदार कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांनीही विठ्ठल परिवार एकनिष्ठ एक तत्वी राहुन विठ्ठल परिवार एक संघ ठेवून यामधून तालुक्याचे विकासाचे राजकारण अर्थकारण समाजकारण केल्याचे चित्र लोकांनी जवळून पाहिले आहे.या दोन जेष्ठ नेत्यांनी गटातटाचे राजकारण करत असताना निष्ठा तत्व अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली.
राजकारणामध्ये निष्ठा आणि तत्व हे दोन्ही अलंकार अत्यंत मोलाचे असतात. तर समाजकारणात चारित्र्य हे महत्त्वाचे असून यात बंडलबाजी करून चालत नाही. हे यापूर्वी या तालुक्यातील नेत्यांनी दाखवून दिले. पूर्वीपासूनच करकंब हा तसा पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार हा बालेकिल्ला असलेला गड आहे. गटातटाच्या राजकारणात यापूर्वी साखर कारखान्याच्या बाबतीत गड आणि वाडा यांना तालुक्यात प्रचंड महत्त्व होते.पांडुरंग परिवाराला व विठ्ठल परिवाराला प्रथम प्राधान्याने करकंब चा विचार करावा लागत होता. आता दोन्ही परिवाराची सैनिक आहेत .पण सेनापती नाही . अशी गत झाल्याची चर्चा करकंबआणि परिसरात ऐकावयास मिळत आहे. राजानी सेनापतींना अलंकार पोशाख पद देऊन अगदी सन्मानित करून मोहीम करण्यास पाठवले. सेनापती
नी राजाने दिलेला सन्मान दिलेले अलंकार अगदी पायदळी तुडवत निष्ठा आणि तत्व याला तिलांजली देत ग्रामपंचायतला हातात हात, तर पंचायत समितीला टाळी.. जिल्हा परिषदेला मिठी, तर आमदार खासदार या मोहिमेत दिमाखदार कामगिरी मुळे राजाही खजील झाला असल्याचे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे. जर युद्धात सेनापतीने युद्ध जिंकले तर विजय हा सेनापतीचा असतो. जर युद्ध हरले तर पराभव हा सैनिकांचा नसून सेनापतीचा असतो. सगळी रसद पुरवूनही सातत्याने पराभवाची नामुष्की का येते? पांडुरंग परिवाराच्या कुरुक्षेत्रा खाली एकत्रित असताना ग्रामपंचायत ला हातात हात तर पंचायत समितीला टाळी.... अशा वेगवेगळ्या भूमिकांमुळे सैनिक आणि सेनापतीला मोहीम फत्ते करता येत नसल्याने सद्यस्थितीत ग्रामपंचायत मध्ये फक्त दोन शिलेदार पाठवण्याची मोठी कामगिरी केली, त्यातच एक शिलेदार हे पूर्वी सोलापूरचे सुशील आदेश पाळणारे, आणि आत्ता बारामतीच्या राजघडीतून नेतृत्व करणारे शिरोमणी यांचा शिक्कामोर्तब असलेले शिलेदार आहेत. आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद च्या लढाईमध्ये पांडुरंग परिवारासाठी ही बाब चिंतेची व आत्मचिंतन करणारी आहे असे राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
करकंब ची राजकीय लढाई ही शोले चित्रपटासारखी झाली आहे. आधे इधर जाओ... आधे उधर जाओ... बाकी सब मेरे पीछे आओ.