*अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर मध्ये फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार* *२०२१ प्राप्त महेश गावडे सरांचा प्रशालेच्या वतीने सत्कार.*
पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर मधील अरिहंत पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक महेश गावडे सर यांना या वर्षीचा फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार २०२१ मिळाला आहे. त्यानिमित्त अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. महेश गावडे सर हे खेळाच्या माध्यमातून विविध मुलांना घडविण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक अरिहंत पब्लिक स्कूलचे मॅनेजमेंट व प्रिन्सिपल यांनी केले.
यावेळी प्रशालेच्या प्रिन्सिपल सौ. सुप्रिया बहिरट यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार केला. सत्कार स्वीकारताना सरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व पुरस्काराचे स्वरूप सांगितले. प्रशालेतील प्रिन्सिपल व सर्व शिक्षकांनी महेश गावडे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.