*नांदोरे येथील एसपी स्कूलचे ए.टी.एस. प्रज्ञाशोध मध्ये नेत्रदिपक यश.....!*   *तब्बल 50 विद्यार्थी गुणवत्ता यादीत.* 

*नांदोरे येथील एसपी स्कूलचे ए.टी.एस. प्रज्ञाशोध मध्ये नेत्रदिपक यश.....!*    *तब्बल 50 विद्यार्थी गुणवत्ता यादीत.* 

करकंब /प्रतिनिधी :-
     राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पायल फाउंडेशन, नांदोरे संचलित एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे या प्रशालेतील 50 विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा तसेच केंद्रस्तरीय केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून घवघवीत यश संपादन केले .
यामध्ये इयत्ता- पहिली मधून श्राव्य सातुरे ,श्रेया जिरेकर, स्वरा पारेकर, आर्यन उलभगत, कल्याण उलभगत, तनिषा उलभगत, स्वरा झुरुळे,आरुष चव्हाण, स्मृती वलगे, स्नेहल बेलदर, तेजश्री ढोबळे, आदित्य शिंदे ,कार्तिक शिंदे, शौर्या भोसले, शौर्य झुरळे ,स्वरा भगत , इयत्ता दुसरी मधून अनिरुद्ध गायकवाड, करण भिंगारे, ओमराज कदम, ऋतुजा सातुरे, सुयश पवार, सानवी मुळे, आरोही साळुंखे प्रणवी मेहता, हर्षराज बाबर, सई माने ,आरोही गायकवाड ,श्रेया पाटील विघ्नेश व्यवहारे, इयत्ता तिसरी मधून विद्या कदम, यशराज व्यवहारे, वेदिका उलभगत, शौर्य सातुरे, समर्थ डरंगे, इयत्ता -चौथी मधून श्रेया येड्रावकर ,सई तळेकर, आसावरी गायकवाड, आरोही उलभगत , अक्षरा व्यवहारे, आयुष येड्रावकर ,तर इयत्ता- सहावी मधून क्षिती जोशी, अहिल्या तळेकर, समृद्धी काटकर, श्रीराम खळगे, यश कांबळे, इयत्ता - सातवी मधून जयराजे भोसले, किशोर पिसे ,स्नेहल सरवदे, विनीत शिंदे, राज कदम या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे.