*करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत विद्यार्थी व पालकांचे उत्साहाने स्वागत***कोरोना चे नियम पाळून प्रशाला सुरू.**श्रीराम प्रतिष्ठान कडून प्रशाले साठी मोफत सॅनिटायझर.*

*करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत विद्यार्थी व पालकांचे उत्साहाने स्वागत***कोरोना चे नियम पाळून प्रशाला सुरू.**श्रीराम प्रतिष्ठान कडून प्रशाले साठी मोफत सॅनिटायझर.*

करकंब/ प्रतिनिधी

 शाळा कधी सुरू होणार.. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली होती. पण गतवर्षाच्या दोन वर्षाच्या काळात कोरोना महामारी च्या संसर्ग रोगाने थैमान घातल्यामुळे संपूर्ण जगच थांबले होते. आता पुन्हा नव्या जोमाने कोरोणा चे सर्व नियम पाळून येथील चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल करकंब     ही प्रशाला पुन्हा एकदा विद्यार्थी-विद्यार्थिनी ने गजबजू लागल्यामुळे प्रशालेमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून प्रशालेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व उपस्थित पालकांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांवर पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी श्रीराम प्रतिष्ठान च्या वतीने या प्रशाले साठी मोफत सॅनिटायझर देण्याचे संतोष बुगड यांनी जाहीर केले.
      या स्वागत संभारंभ प्रसंगी मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम यांनी कोरणा चे नियम व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजीव कुमार मेहेत्रे  सचिव अविनाश देवकते करकब मेडिकल संघटनेचे दुकानदार संतोष बुगड डॉक्टर स्नेहा प्रसाद पुरवत , पालक सदस्य कवडे साळुंखे खरे व शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक शंकर गायकवाड यांनी मानले.