कौठाळी गावातील कोरोना लसीकरणसाठी स्वाभीमानीचा पाठपुरावा* *लसीकरण वाढविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन अटकळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन*
पंढरपूर :-प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावाची लोकसंख्या सुमारे ४००० हजार असून फक्त १०% लसीकरण झाले असल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते ,तरी कोठळी गावामध्ये लसीकरण वाढविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन अटकळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले. कोरोना महामारी मुळे कौठाळी गावातील सुमारे ३५ लोकांचा जीव गमावला असून गाव रेड झोन मध्ये आहे, गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात येणार्या लसीकरण लाभ ही थोड्या प्रमाणात मिळत असल्यामुळे नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, वयोवृद्ध महिला यांना या तिसर्या लाटेचा फटका बसू शकतो या बाबींचा विचार करून लवकरात लवकर अतिरिक्त कोरोना लसीकरणाचा कॅम्प आयोजित करावा अशी मागणी ग्रामस्था मधून होत आहे. पंढरपूर तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत कौठाळी गावात लसीकरण फारच कमी असल्याने कोरोना वाढीचा आकडा कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन लसीकरण कॅम्प आयोजित करावा असे या निवेदनात म्हटले आहे .यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, विकास नागटिळक, श्रीकांत नागटिळक उपस्थित होते.