*ग्रामीण भागाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध-आमदार बबनदादा शिंदे* *कान्हापुरी उंबरे येथे विविध विकास कामाचे आमदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन* *भावी आमदार रणजीत सिंह शिंदे यांनीही कान्हापुरी उंबरे जळवली येथे केला विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा शुभारंभ* *भविष्यात ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध करून देणार*
करकंब /प्रतिनिधी
आज माढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.बबनदादा शिंदे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या २५१५ दलित वस्ती जनसुविधा 15 वा वित्त आयोग विकास कामाचा शुभारंभ कामांचे भूमिपूजन माढा विधानसभा मतदार विकास रत्न आमदार बबनदादा शिंदे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य भावी आमदार रणजितभैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी बारामतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव करंकब पोलीस स्टेशनचे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख, जळोली सरपंच ज्योतीराम मदने, करोळे गाव चे सरपंच कुडलिक गायकवाड बार्डी चे अभिजीत कवडे, पोपटमामा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले सरपंच प्रेमभैया चव्हाण उपसरपंच राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्व स्टॉप शिक्षक स्टॉप ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या विकास कामाच्या उद्घाटन समारंभ व कोविड योद्धा सन्मान सोहळा प्रसंगी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी मी कायमपणे कटिबद्ध असून या ग्रामीण भागातील अडीअडचणी आणि भविष्यामध्ये या ग्रामीण भागासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले . ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक व जिल्हा परिषद शिक्षक आशा वर्कर मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायत कान्हापुरी यांच्या वतीने गौरवण्यात आले.