*रामभाऊ जोशी हायस्कूल ची विद्यार्थिनी शिवानी ढोबळे केंद्रात प्रथम....!*    *सलग दहा वर्ष सेमी इंग्रजीचा शंभर टक्के निकाल.* *111 पैकी 110 विद्यार्थी उत्तीर्ण.*

*रामभाऊ जोशी हायस्कूल ची विद्यार्थिनी शिवानी ढोबळे केंद्रात प्रथम....!*    *सलग दहा वर्ष सेमी इंग्रजीचा शंभर टक्के निकाल.*  *111 पैकी 110 विद्यार्थी उत्तीर्ण.*

 करकंब/ प्रतिनिधी:-
     येथील डी.ए.व्ही.काॅलेज ट्रस्ट & मॅनेंजमेंन्ट सोसायटी नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूलचा  करकंब ता पंढरपूर या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या प्रशालेतील शिवानी रमेश ढोबळे हिने 97.20% गुण प्राप्त करून करकंब गावात व केंद्रात प्रथम आल्याने तिचे करकंब परिसरातून कौतुक व अभिनंदननाचा वर्षाव केला जात आहे.
रामभाऊ जोशी हायस्कूलचे. 95% च्या पुढील  03 विद्यार्थी,
90% च्या पुढे 12 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी बाजी मारत गुण प्राप्त केले आहेत. या प्रशालेतील
एकूण विद्यार्थी- 111
विशेष योग्यता श्रेणी- 80
प्रथम श्रेणी- 25
द्वितीय श्रेणी-04
पास श्रेणी- 01
गैरहजर-01 इयत्ता दहावी (एसएससी) चा परीक्षेत बसले होते. मध्ये या रामभाऊ जोशी हायस्कूलच्या प्रशालेतील
1)  शिवानी रमेश ढोबळे 97.20% करकंब केंद्रात प्रथम
 2)  रोहन किरण ढोबळे 95.60%
 3) रोहित बाळू शेटे 95.40%                                                     
 4)  सानिका संजय जानकर 93.60%
5) रोहन अशोक कुंभार 93.40%
6)  प्रथमेश सुनील टेके 93.20%
7)  सना नूर मोहम्मद काझी 92.20%
8) आशुतोष अंकुश जाधव 91.20% 
9)  रुद्र रवींद्र गुजरे 91.00% 
10)  शुभम बंडू भोसले 90.80%,11) सोहम सत्यवान व्यवहारे 90.60%,
12) सानिका रवींद्र गळीतकर 90.60%,13) अजय भारत नलवडे 90.60%
14)  स्नेहल श्रीपती खाडे 90.40%
15)  संकेत लक्ष्मण शिंदे 90.40%
   या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक - धनवंत करळे सर (विज्ञान विषय) व वर्गशिक्षक-  सुरेश दहीगिरे सर(मराठी विषय), व्ही जी कुलकर्णी सर (इंग्रजी विषय),  घुले सर (गणित विषय) ,गायकवाड सर (समाजशास्त्र विषय)यांचे मार्गदर्शन लाभले
      या सर्व यशस्वी विद्यार्थांचे दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर चे स्थानिय सचिव महेश चौप्रा , प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे सर, प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे सर, शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.