*नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत करकंब मध्ये विविध सेवा कार्यक्रम संपन्न*. *NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*. *गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण संपन्न

*नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत करकंब मध्ये विविध सेवा कार्यक्रम संपन्न*.  *NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*.  *गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप व वृक्षारोपण संपन्न

करकंब /प्रतिनिधी 

भारताचे लाडके  यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा सुशासन आणि गरीबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे देशातील गोरगरीब शोषित वंचित शेतकरी कामगार वर्गाच्या कल्याणाकरीता देश सेवेचे ध्येय साध्य करीत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे माननीय नरेंद्रजी मोदीजींचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर गांधी जयंती या काळात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध सेवा कार्य करून देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य मिळो  यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगतप्रसाद नड्डा यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सेवा पंधरवडा साजरा होत आहे व त्याच अनुषंगाने आपण आज करकंब येथे न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  गरजवंत विद्यार्थ्यी यांना गणवेश व  शैक्षणिक शालेय साहित तसेच वृक्षारोपण व NMMS परीक्षामध्ये उत्तीर्ण गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यानिमित्त उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य मा. बाळासाहेब देशमुख पंचायत समिती सदस्य,  राहुल काका पुरवत, मनोज पवार कामगार आघाडी  भाजपा जिल्हा सरचिटणीस ,  लक्ष्मण वंजारी तालुका भाजपा सरचिटणीस , संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे इ. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये  आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या आठ वर्षाच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये अनेक कल्याण कारी योजना राबवुन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास करुन वंचित शोषित पीडित कामगार शेतकरी  यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले व संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचा दबदबा कसा निर्माण केले ते सांगितले.
          या कार्यक्रमासाठी  राजेंद्र करपे ओबीसी तालुका सरचिटणीस,   बंडू कुलकर्णी भाजपा शहर अध्यक्ष करकंब.   विजय मामा माळी, खंडू शिंदे,  परमेश्वर शिंदे ऋषिकेश वाघमारे,  बापू नाना शिंदे ग्रामपंचायत सदस्य,  नितीन खाडे  शाळा व्यवस्थापन सदस्य  तसेच  भाजपाचे इतर पदाधिकारी तसेच  संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर ,सचिव   देवकते सर ,मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम ,पर्यवेक्षिका शिंदे मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.