*रेश्मा मोरे यांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान...!*

*रेश्मा मोरे यांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान...!*

करकंब /प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर पुरस्कार बावी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गट चळवळीच्या नेत्या रेश्मा मोरे यांना प्रदान करण्यात आला. सोबत 2006 पासून ग्रामीण महिलांना एकत्र करून त्यांना बचतीची सवय लावण्याचे काम रेश्मा मोरे यांनी सुरू केले 2006 ते 2023 पर्यंतच्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात अनेक महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण व स्व भांडवल उपलब्ध करून देणे शेळीपालन शिलाई काम दुधव्यवसाय पापड उद्योग यासारखे व्यवसाय सुरु करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे बचत गटाचा कारभार पारदर्शक ठेवत आज जवळ जवळ चार कोटी पेक्षा जास्त भाग भांडवल करत अनेक जणांना रोजगार निर्माण करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले, पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की महिलांच्या मध्ये असणाऱ्या विविध गुणांना वाव देण्या साठी घरातील पुरुष मंडळींनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे माझ्या बाबतीत माझे पती दत्तात्रय मोरे महाराज यांनी माझ्या प्रत्येक सकारात्मक कार्यास खंबीर पाठिंबा देऊन मला काम करण्यास बळ दिले त्यामुळेच हे शक्य झाले, भविष्यात याहून उत्तम काम करण्याचा माझा प्रयत्न राहील ग्रामीण भागातल्या महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत इथून पुढच्या काळामध्ये माझ्या परीने मी करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमास बावीच्या सरपंच वंदना काकी मोरे ग्रा पं सदस्या पूजा नंदकुमार मोरे ग्रा पं सदस्य भाजपा तालुका सरचिटणीस दत्तात्रय मोरे नंदकुमार मोरे अरुण मोरे रोटरीचे अध्यक्ष औदुंबर पाटील सुनील आप्पा मोरे
कल्याण मोरे ग्रामसेवक यादव भाऊसाहेब तलाठी मोहिते भाऊसाहेब आणि गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.