*कुरुल येथे कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ  भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान* *७१हजाराचे पाहिले बक्षीस दिले आहे उद्योजक राजू खरे यांनी*

*कुरुल येथे कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ  भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान*  *७१हजाराचे पाहिले बक्षीस दिले आहे उद्योजक राजू खरे यांनी*

पंढरपूर प्रतिनिधी 

    मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ रविवारी १७डिसेंबर रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांच्या तर्फे पहिल्या कुस्तीसाठी रोख ७१हजार रूपयांचे बक्षीस  देण्यात आले. या मैदानातील ही पहिली कुस्ती  लावण्याचा मान संयोजकांचे वतीने राजू खरे यांना देण्यात आला. फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कारही करण्यात आला.

   या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष न.प.पंढरपुर मा.वामन(तात्या) बंदपट्टे,वस्ताद पै.बाळासाहेब चवरे,मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख प्रकाश(दादा)पारवे, बेगमपूरचे सरपंच प्रकाश सपाटे,युवा नेते गणेश जाधव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले,चंदनशिवे सर,लखन वाघमारे,निखील गायकवाड,आतिश सावंत व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकट

*पाटकुलचे कुस्तीसाठी एक लाखाचे बक्षीस*

मंगळवार दि १९डिसेंबर रोजी,मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठीही उद्योजक राजू खरे यांनी पाहिले बक्षीस म्हणून रोख १लाख १हजार रुपये संयोजक यांच्याकडे जमा केले आहेत. यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघात इतर सुरू असलेल्या मदतीबरोबर आता राजू खरे यांच्याकडून मैदानी खेळासाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसून येत आहे