*एस.पी.स्कूलच्या अथर्व गायकवाड यांची नवोदय साठी निवड*
करकंब /प्रतिनिधी:-
नांदोरे ता.पंढरपूर येथील पायल फाउंडेशन संचलित एस. पी. स्कूलचा विद्यार्थी अथर्व जयसिंग गायकवाड याची केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेमध्ये सर्वसाधारण मधून निवड झाली असून त्याला पोखरापूर येथील नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक मा.आ. बबनदादा शिंदे ,डॉ. नंदकुमार होनराव,संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे यांनी केले.
यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांचा प्रशालेच्या वतीने गौरव करण्यात आला. यापूर्वीही एस.पी.स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. या पुढील काळातही प्रशालेतील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय साठी पात्र होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे.