*भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती ( IAS )परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे नैत्रदिपक यश.* *(तब्बल सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत )*
करकंब/ प्रतिनिधी :-
भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती ( IAS ) परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला,यामध्ये पायल फाउंडेशन, नांदोरे संचलित एस. पी. स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन केले. या परीक्षेसाठी स्कूलमधील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि परीक्षेसाठी पंढरपूर तालुक्यातून पंढरपूर हे एकच केंद्र होते .
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरी मधून अनिरुद्ध श्रीनिवास गायकवाड केंद्रात तृतीय ,राज्यात सातवा, इयत्ता पाचवी मधून वेदांत संतोष वलगे केंद्रात दुसरा जिल्ह्यात चौथा ,अथर्व जयसिंग गायकवाड केंद्रात पाचवा तसेच इयत्ता आठवी मधून श्रेया नंदकुमार काटकर केंद्रात प्रथम जिल्ह्यात चौथा व राज्यात अकरावा क्रमांक, संचिता संतोष फाळके केंद्रात द्वितीय, जिल्हयात सहावा ,राज्यात तेरावा तर मनस्वी प्रविण खळगे हिने केंद्रात तृतीय क्रमांक मिळवून संपादन केले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार होनराव, संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शहाजी साठे, अमरनाथ इंगोले, साईनाथ कुंभार, रामचंद्र सावंत, कादर मुलाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्कूलचे तसेच विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.