*करकंब पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन....!*
करकंब /प्रतिनिधी
:-रमजान ईद च्या निमित्त करकंब येथील सोमवार पेठेतील रोजा गल्लीतील मज्जिद येथे करकंब पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईदच्या सणानिमित्त मुस्लिम समाज बांधवांना या इतर पार्टीचे औचित्य साधून करकंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक -निलेश तारू यांनी उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना करकंब पोलीस स्टेशन च्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसप्पा देशमुख, माजी सरपंच -मारुती देशमुख, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत, भारतीय जनता पार्टी चे अल्पसंख्याक सरचिटणीस- सलीम बागवान,रियाज बागवान, ग्रामपंचायत सदस्य -बापू शिंदे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष -महादेव देशपांडे, मुस्तफा बागवान, मनाजी बागवान, सतीश सोनकांबळे, युसुफ बागवान, कयूम बागवान , अबूबकर मुजावर,करकंब पोलीस स्टेशनचे पोह.-आर आर जाधव, पो.ह.-बालाजी घोळवे, पोह. सचिन गावडे ,वाहतूक पोलीस हवा. विजय गोरवे, पो.ना.सागर भोसले पो. वाहन चालक हवा. वाघमारे, घोडके व करकंब पोलीस स्टेशन स्टॉप यांच्या सह पत्रकार,विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मुस्लिम समाज बांधव बहुसंख्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित बांधवाना पोलीस बांधवांच्या वतीने मिष्टान्न देण्यात आले तर सामाजिक सलोखा व भाईचारा असाच असावा. ही अपेक्षा सपोनि -निलेश तारू साहेबांनी व्यक्त केली. या वेळी सर्व उपस्थित बांधवांनी करकंब पोलिसांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.