*आम आदमी पार्टीच्या वतीने महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर सत्यागृह आंदोलन* *जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ केंद्र सरकारचा केला निषेध*
पंढरपूर/प्रतिंनीधी
आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा आणि शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दि 16 एफ्रिल रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी देऊन केंद्र सरकारच्या कुटिल कारस्थांच्या विरोधात सत्याग्रह करून निषेध नोंदवण्यात आले .केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला कथित घोटाळ्यामध्ये अडकवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार केला

. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अशाच पद्धतीने त्रास देण्यासाठी सीबीआय चौकशीसाठी बोलावले आहे या निषेधार्थ सत्याग्रह करून निषेध नोंदवण्यात आले आहे, यावेळी जिल्हाध्यक्ष श्री एम पाटील, जिल्हा सचिव रुद्रप्पा बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक चांदणे, आतिश गायकवाड, संघटक आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष हेमंत जाधव,शहर सचिव नाशिक मंगलगिरी, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष इलियास शेख, उपाध्यक्ष मेहमूद गब्बुरे व अध्यक्ष निलेश संगेपाग, श्रमिक विकास संघटनेचे शहराध्यक्ष मल्लिकार्जुन पिलगिरी, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश ननवरे, श्री यल्लाप्पा चौगुले, श्री राहुल गायकवाड ,श्री नागेश सलगर ,मोहोळ तालुका अध्यक्ष आनंद पाटील ,आधी कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या कुटील कारस्थान च्या विरोधात घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त करण्यात आले .