*करकंब येथील धाकटी वेस ते जळोली चौक पुलास शासनाच्या बजेट मध्ये तत्वतः मंजुरी....!* *अजितसिंह देशमुख मित्र परिवाराच्या प्रयत्नांना अखेर यश.*
करकंब /प्रतिनिधी
- येथील धाकटी वेस ते जळोली चौक करकंब या दरम्यान असलेल्या पुलाची उंची वाढवण्यासाठी माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष- अजित सिंह देशमुख, अशोक सिंह देशमुख ,माढा विधानसभा राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे अध्यक्ष -मिथुन चंदनशिवे (सर), नितीन दुधाळ ,महेश गुजरे ,रामचंद्र सलगर ,राजेंद्र खारे, शैलेश जवारे ,मुन्ना शहा ,संतोष शिंदे यांनी माढा- पंढरपूर विधानसभा चे लोकप्रिय आमदार- बबनदादा शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या पुलाची उंची वाढवण्या संदर्भात मागणी केलेली होती.
या पुलाच्या संदर्भात अजित सिंह देशमुख व अशोक सिंह देशमुख यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे गेली दोन वर्ष सातत्याने पुलाची उंची वाढवण्या संदर्भात व लोकांची गैरसोय होत असल्याबाबत मागणी केल्याने या पुलाच्या ठिकाणी लोकप्रिय आमदार- बबनदादा शिंदे यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्याच अनुषंगाने लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांनी या पुलासाठी विशेष प्रयत्न करून शासनाच्या या आर्थिक बजेट मध्ये तत्वता मंजुरी मिळवली. यापूर्वी ही लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून करकंब चौक (करकंब चौक -नगर) ते नवरा नवरी (मोडनिंब रस्ता) या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करून हा रस्ता करण्यात आला आहे.या पुलाचे लवकरच काम सुरू होणार असल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ ,शेतकरी ,विशेषता अबाल वृद्धांना, महिलांना होणारी अडचण आणि गैरसोय यामुळे दूर होणार असल्याने करकंब व पंचक्रोशीतून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
करकंब ते जळोली चौक हा रस्ता करकंब गावात येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर बऱ्याच वर्षांपूर्वीचा जुना पूल आहे. या पुलाच्या पुढे बंधारा बांधला असल्याने बंधारा बांधते वेळी या पुलाची उंची वाढवणे गरजेचे होते. परंतु उंचीचा विचार केला नाही. त्यामुळे ओड्याला पाणी आले की बंधारा भरत असतो. आणि या पुलावर तीन ते चार फूट पाणी येत असते. ही बाब अत्यंत धोकेदायक आहे. या पुलानजीक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेत येणारे विद्यार्थी, गावात येणारे ग्रामस्थ, शेतकरी, आबाल वृद्ध महिलावर्ग, यांची प्रचंड गैरसोय व कुचंबना होऊन यांना या पाण्यातूनच वाट काढावी लागून अक्षरशा जीव धोक्यात घालून पूल ओलांडून जावे लागत असल्यामुळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे होते. आणि या पुलाच्या उंची वाढवण्यासंदर्भात अजित सिंह देशमुख मित्रपरिवाराने लोकप्रिय आमदार- बबनदादा शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या पुलाची उंची वाढवण्या संदर्भात शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता करकंब सह पंचक्रोशीतून गावात येणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होणार आहे.