*रामनामांमुळे इच्छा आणि वासनांचा क्षय होऊन बुध्दी स्थिर होते :-विश्वासबुवा कुलकर्णी* *आज बाळगुरु नाव्हेकर यांच्या कीर्तनाने नारदीय कीर्तन महोत्सवाची सांगता.*
करकंब /प्रतिनिधी. :-
करकंब श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रवणीय नारदीय कीर्तन महोत्सवात विश्वास बुवा कुलकर्णी यांनी सांगितले सुरुवातीला अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत,विठ्ठल पांढरे,सुरेश रेपाळ,मोहन रसाळ, मोतीराम मेहरकर,अशोक माळी ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते चौंडेश्वरी मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले आणि कीर्तनाला प्रारंभ झाला पूर्वरंगामध्ये समर्थांच्या श्लोकावर निरूपण करताना सांगितले की नामस्मरण केल्याने महादोषांच निवारण होते,आणि इच्छा,वासना यांचा क्षय होऊन बुध्दी स्थिर होते, तर मनुष्य कोणतंही काम करताना आपल्याला काय फायदा यांचा विचार करत असतो परंतू परमार्थ हा फायद्यासाठी न करता समाधान महत्वाचं असून ते टिकून आनंद देण्याचा काम परमार्थ करतो आणि तो परमार्थ सर्वांनी करावा,पुण्यांच फळ पाहिजे मात्र पुण्य करायला नको वाटतं म्हणजे निस्वार्थी काम पण पाप केल्यान शिक्षा मिळते माहित असून सुद्धा माणूस पापकर्माकडे वळतो हे मोठं दुर्देवी आहे,मन अतिशय चंचल आहे ते नामात गुंतवले पाहिजे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे,प्रपंचात आसक्ती कमी झाली तरच प्रपंच सुखाचा होतो नाहीतर आहेच मरेपर्यंत हे पाहिजे ते पाहिजे, रामनामाने माणूस तरतो सांगून उत्तररंगामध्ये संत तुलसीदास यांचं अप्रतिम आख्यान सांगितले मनुष्याची संगत चांगली असेल तर वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागत नाही,वासना आणि इच्छांनी बरबटलेल्या संसारात मग्न असलेले तुळशीदास अखंड नामस्मरण केल्याने रामरायाचे कसे दर्शन घडले सुंदर व्याख्यान सांगून करकंब करांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम कौस्तुभ परांजपे तबला शिवराज पंडीत यांनी केली.यावेळी अनेक रसिक श्रोता मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज नारदीय कीर्तनाचा सांगता समारंभ बाळगुरु नाव्हेकर यांच्या कीर्तनानी होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे .
तसेच महिलांसाठी आज दुपारी झटपट स्पर्धा उद्या ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने करण्यात येत आहे.महोत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त कोष्टी समाज बांधव आणि महिला अधिक परिश्रम घेत आहेत.*
*फोटो सौजन्य क्लासिक फोटो चवरे सर*