*ध्येय निश्चित करा तरच यश मिळेल:- डॉ. श्रीपाद जोशी* *युथ फॉर जत टॅलेंट स्कॉलरशिपचे वितरण*
हुलजंती ; प्रतिनीधी
संघर्ष हा जत च्या विद्यार्थ्यांचा स्थायीभाव आहे. संघर्ष इथल्या मातीतील लोकाच्यात कणाकणात व मना -मनात ठासून भरला आहे. त्यामुळे परिस्थितीचे कारण लंगडे आहे, गरिबी सहन करा , मेहनत करा, विद्यार्थ्यांनी डोक्यात नव्हे तर मनात धेय निश्चित करा, यशाचा मार्ग आत्ताच निवडा. आहार, विहार, निद्रा सांभाळा". कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा तरच यश मिळेल असे प्रतिपादन माजी प्राचार्य,तथा लेखक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले.
जत येथे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या युथ फॉर जत या शैक्षणिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅलेंट शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलत होते. यावेळी नवोदित युवा लेखिका कु. ऋतुजा सावंत हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ विवेकानंद राऊत , मधुकर शिंदे ,भक्तराज गर्जे , जितेंद्र बोराडे , संस्थेचे अध्यक्ष दिनेश शिंदे ,सचिव अमित बामणे ,सचिन जाधव , प्रमोद साळुंखे, भूपेंद्र बाबासाहेब कांबळे,अनघा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा भरपूर आहेत परंतु मार्गदर्शन अभावी चुकीचे मार्ग निवडत आहेत. पालकांनी आपली मते पाल्यावर लादू नये .त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत संधी द्यावी. सन २०१६ पासून युथ फॉर जत या शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करण्याचा जणू विडाच उचलला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये संस्थेने संगणक वाटप, दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सायकलीचे वाटप, डिजिटल शाळा, शाळा दुरुस्ती, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शिबिरे, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत लायब्ररी, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे आदी स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. समाजातील सर्व घटकांनी व विद्यार्थ्यांनी यूथ फॉर जत संस्थेला सहकार्य करावे असे आवाहनही केले. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या वाटचालीबद्दल व भारतीय योगदानातील महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याची उदाहरण जोशी यांनी दिले
जतचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विवेकानंद राऊत यांनी यशाचा खरा अर्थ सांगत, जीवनात येणाऱ्या संघर्षाला सामोरे कसे जावे, विद्यार्थ्यांनी अंगी नम्रता धाडस, सकारात्मक मानसिकता बाळगावी.व स्व निर्मितीचा शोध घ्यावा असे मार्गदर्शन केले.
चौकट
जत तालुक्यातील विज्ञान शाखेतील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून युथ फॉर जत या संस्थेने काजल धोंडीबा माने .प्रथम क्रमांक(सिद्धनाथ), साक्षी शंकर सावंत. बनाळी (द्वितीय क्रमांक),आविना अशोक कांबळे (लवंगा) तृतीय क्रमांक, गुलाब बीरा ठोंबरे (कुलाळवाडी ) चतुर्थ क्रमांक, सुशांत लक्ष्मण सावंत या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले नवोदित युवा लेखिका कु. ऋतुजा सावंत हिच्या हरवलेली आपुलकी या पुस्तकाबद्दल सत्कार करण्यात आले.