*पंढरपूर  बाजार समिती निवडणूकीसाठी42गावातील  सदस्यांची भूमिका गुलदस्त्यातच....!*.. *राष्ट्रवादीचेआमदार- बबनदादा शिंदे यांचा आदेश कोणासाठी? याकडे लक्ष*

*पंढरपूर  बाजार समिती निवडणूकीसाठी42गावातील  सदस्यांची भूमिका गुलदस्त्यातच....!*..  *राष्ट्रवादीचेआमदार- बबनदादा शिंदे यांचा आदेश कोणासाठी? याकडे लक्ष*

करकंब /प्रतिनिधी :-

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचीआर्थिक जननी  म्हणून नावाजलेल्या पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असून या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये सध्या सरपंचांना "वेट अँड वॉच" चा सल्ला दिल्याने सध्या तरी सरपंचा सहित ग्रामपंचायत सदस्यांची या निवडणुकीत अजूनही भूमिका "गुलदस्त्यात" असल्याने ही ग्रामपंचायत मतदार संघातील निवडणूक प्रचंड अटीतटीची होणार असून माढा -पंढरपूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय आमदार -बबनदादा शिंदे यांना मानणारा गट या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे. त्यातच या माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार- बबनदादा शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे तथा सोलापूर जिल्ह्याचे नेते- प्रशांत मालक परिचारक यांना साथ देणार की....! राष्ट्रवादीसी जवळीक असणाऱ्या विठ्ठल चे चेअरमन -अभिजीत आबापाटील यांच्याशी हात मिळवणी करणार....? याकडेही करकंबसह 42 गावांचे लक्ष लागून राहिले आहे‌.
    पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत माढा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील करकंब सह 42 गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेआमदार- बबनदादा शिंदे यांना मानणारा वर्ग असून या भागातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार -बबनदादा शिंदे यांच्याशी सातत्याने संपर्क साधून असतात. त्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार -बबनदादा शिंदे यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्वाची ठरणार असल्याचे राजकीय तज्ञातून बोलले जात आहे.
      कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ग्रामपंचायत मतदार संघातील निवडणुकीत प्रथमच काट्याची टक्कर होत असून या निवडणुकीत पांडुरंग परिवाराच्या विरोधात विठ्ठल चे चेअरमन -अभिजीत आबा पाटील यांनी रणसिंग फुंकल्याने अधिकच चुरस वाढली असून विठ्ठल चे चेअरमन-अभिजीत आबापाटील यांची वाढती "क्रेझ "या पंढरपूर -माढा विधानसभा मतदारसंघात निर्माण होत असल्याने पांडुरंग परिवाराच्या उमेदवारासाठी ही बाब "डेंजर झोन" असल्याची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे पांडुरंग परिवाराच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणता "करिष्मा" दाखवतील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. विठ्ठल कारखान्याच्या "स्वाभिमानी" सभासदांनी अनेक वर्षापासून बंद असलेला "श्री विठ्ठल" सहकारी साखर कारखाना -"कारखाना चालवणारा माणूस"-अभिजीत आबा पाटील यांच्या हातात "विश्वासाने" सोपवला.त्याच पद्धतीने या पंढरपूर तालुक्यातील "कृषी उत्पन्न बाजार समिती" तील सोसायटी मतदार संघ ग्रामपंचायत मतदार संघ व इतर मतदारसंघातून याच विश्वासाच्या बळावर आणि "स्वाभिमानी" सभासदांच्या "आशीर्वादाने" कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत"यश" मिळवणार का....? या पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.