*म्हणूनच  सभासदांनी दिला अभिजीत पाटील आणि रोंगेसर यांना कौल*  *मागील निवडणुकीत रोंगेसर यांनी सांगितले की  विठ्ठल पडणार बंद* *या निवडणूकीत अभिजीत पाटील यांनी मात्र पाठविले हा कारखाना मीच कसा वाचविणार*

*म्हणूनच  सभासदांनी दिला अभिजीत पाटील आणि रोंगेसर यांना कौल*   *मागील निवडणुकीत रोंगेसर यांनी सांगितले की  विठ्ठल पडणार बंद*  *या निवडणूकीत अभिजीत पाटील यांनी मात्र पाठविले हा कारखाना मीच कसा वाचविणार*

पंढरपूर/प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील वेळची चूक दुरुस्त करीत चक्क परिवर्तनासाठी उभा केलेल्या या लढ्यातील डॉ रोंगेसर आणि अभिजीत पाटील यांच्या एकत्रित पॅनलला एकहाती विजयी केले आहे.
   विठ्ठलच्या  मागील निवडणुकीत  आ. भारत भालके यांच्यासह सर्व प्रस्तापित नेतेमंडळी एकत्रितपणे असतानाही डॉ रोंगेसर यांनी आपल्या सहकाऱ्यासह निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये पराभव डोळ्यासमोर दिसत असतानाही केवळ या कारखान्यातील सभासद आणि कामगार यांचे हित असलेल्या या विठ्ठलची आर्थिक घडी विस्कटली असून, हा आपला राजवाडा लवकरच कुलूपबंद होणार असे भाकीत नव्हे तर अभ्यास नुसार पटवून दिले होते. परंतु सभासदातून रोंगेसर यांची भूमिका रुजली नव्हती.परंतु काही हुशार सभासद यांनी याबद्दल विचारपूर्वक मतदान करीत रोंगेसर यांची भूमिका जवळपास सहा हजार पेक्षा जास्त लोकांना समजली होती. त्यामुळे त्यांनी मतदान दिले होते.भविष्यात रोंगेसर यांनी तळमळीने सांगितलेली माहिती अवघ्या दोन वर्षात खरी वाटू लागली आणि कारखाना खरोखरच आर्थिक अडचणीत सापडला.


   या निवडणुकीत याउलट परिस्थिती दिसून आली. राज्यामध्ये ५ साखर कारखाने असणारे अभिजीत पाटील यांनीच या निवडणुकीत उडी घेतली होती. ते स्वतः या विठ्ठलचे सभासद असल्याने ही विठ्ठलची झालेली दयनीय अवस्था पाहून निवडणूक लढविण्यासाठी महत्वाचे कारण केले होते. यासाठी परिवर्तनाच्या लढ्यासाठी आपली यंत्रणा तयार ठेवली होती. परंतु अतिशय हुशारकी दाखवीत विठ्ठल परिवारातील  कोणत्याही मोठया नेत्याबरोबर युतीसाठी तयारी न दाखविता ,केवळ या निवडणुकीतील विजय मिळविण्यासाठी ज्या रोंगेसर यांनी मागील निवडणुकीत पेरणी केली होती, ते आता उगविले होते. याचाच फायदा उचलण्यासाठी अभिजीत पाटील यांनी रोंगेसर यांच्याकडे आपल्या सोबत येण्यासाठी साद घातली आणि रोंगेसर यांनीही होकार देत मिळून निवडणूक लढविण्यासाठी तयारी झाली.
  मागील निवडणुकीत हा कारखाना बंद पडणार आहे. हा प्रमुख मुद्दा विरोधी रोंगेसर यांच्या पॅनलच्या वतीने गाजविला होता. या निवडणुकीत मात्र हा बंद पडलेला कारखाना मी कसा सुरू करू शकतो हे अभिजीत पाटील यांना पटवून द्यावे लागले. यामध्ये मागील निवडणुकीत विरोधी रोंगेसर यांनी सांगितलं खर2झाले, यामुळे आता रोंगेसर सोबत असलेले अभिजीत पाटील हा कारखाना सुरू करू शकतील असा पटकन विस्वास ठेवीत या पॅनलला विजयी केले आहे.
   याच निवडणुकीत दिलेल्या अस्वासनाची पूर्तता करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निकाल दिवशीच जाऊन ,कामावर नसलेल्या कामगारांना उद्यापासून कामावर या असे फर्मान सोडले आहे. यामुळे निराशाजनक असलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
 कामगार यांना बोलावले म्हणजे काम करण्यासाठी आणि कारखान्यातील कामे पूर्ण केल्यावर कारखाना सुरूच होणार असा विस्वास सभासद आणि कामगार यांच्यामध्ये पहिल्याच दिवशी बसला आहे. असे हे संचालक मंडळ नक्की काहीतरी करून दाखविणार असा मोठा आशावाद निर्माण झाला असून. याचे पाडसद पंढरपूर तालुक्यातील राजकिय समीकरणे नक्की बदलविणार हे मात्र नक्की दिसत आहे.