*विठ्ठल’साठी 230 उमेदवारी अर्ज दाखल**गुरुवारीअखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने होणार उमेदवारी दाखल*

*विठ्ठल’साठी 230 उमेदवारी अर्ज दाखल**गुरुवारीअखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने होणार उमेदवारी दाखल*


। पंढरपूर,/ प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 जून पासून सुरूवात झाली असून बुधवार  दि. 8 जून पर्यंत एकूण 219 उमेदवारांकडून 230 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  गुरूवार दि. 9 जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार आहेत.
यामध्ये भाळवणी गटातून 29, करकंब गट 35, मेंढापूर गट 16, तुंगत गट 31, सरकोली गट 31, कासेगांव गट 21, ऊस उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था गटातून 6, महिला गटातून 26, इतर मागास वर्गीयमधून 7, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग मधून 19,   अनुसूचित जाती किंव जमानी गटातून 9  असे     एकूण  230 उमेदवारी  अर्ज दाखल झाले आहेत.
बुधवार दि. 8 जून  रोजी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारामध्ये भाळवणी गटामधून बजरंग रामदास जाधव, बाळासाहेब महादेव पाटील हणुमंतराव मच्छिद्र पाटील, विलास विष्णू देठे, शांतीनाथ बाबुराव बागल, मधुकर शामराव गिड्डे, सुभाष नाना जगदाळे, राजेंद्र प्रल्हाद काळे, दिपक दामोदर पवार, संजय नामदेव काळे, बाबासाहेब शिवाजी काळे, धनंजय उत्तम काळे, हणुंमत शंकर नागटिळक, कालिदास रघुनाथ पाटील, संतोष भालचंद्र गाजरे, अनिल अरूण बागल.
करकंब गटामधून नवनाथ  ज्ञानेश्‍वर भगवान मोरे, मोहन नामदेव उपासे, राजाराम नागनाथ भिंगारे, किरण राजाराम भिंगारे, मारूती नारायण गायकवाड, दत्तात्रय विश्‍वनाथ नरसाळे, महादेव भिमराव सांळुखे, मारूती श्रीमंत भिंगारे, रामकृष्ण नारायण जवळेकर, जिवराज वसंत चव्हाण, अशोक वसंत चव्हाण, हणुमंत ज्ञानोबा पवार, सिध्दराम देविदास पवार, कांतीलाल रंगनाथ भिंगारे, अनिल सुदर्शन सावंत, कांतिलाल नारायण गलांडे, दशरत पंढरीनाथ खळगे, शहाजी माणीक मुळे, जगन्नाथ भिमराव शिंदे, बाहुबली पोपटलाल पुरवत, अभिषेक अभयकुमार पुरवत, राहुल पांडुरंग शिंगटे,  मेंढापूर गटातून देवानंत रावसाहेब गुंड, गणेश पांडुरंग पाटील, दिनकर आदिनाथ चव्हाण, बळिराम यशवंत पाटील, युवराज विलासराव पाटील, बाळासाहेब शिवाजी पाटील, दशरथ भगवान चव्हाण, वंसत सुब्राव चव्हाण, रघुनाथ दगडू पिसे.
तुंगत गटातून रमेश धर्मराज बाबर, दत्तात्रय निवृत्ती रणदिवे, गणेश कृष्णा चव्हाण, दिनेश रामहरी रणदिवे, बाळासो भानुदास पाटील, रामहारी अनंता रणदिवे, अमोल मनोहर पाटील, अशोक ज्ञानोबा जाधव, दिनकर दत्तात्रय पाटील, तात्यासो चंद्रकांत वाघ, शशिकांत त्र्यबक शिरगिरे, विक्रांत चंद्रकांत पाटील, मनिषा नाना कवडे, सुनदा हणुमंत पवार, शालिवाहन भागवत कोळेकर, हणुमंत ज्ञानोबा पवार, मच्छिद्र दत्तू सपाटे. सरकोली गटातून भास्कर औंदुबर मोरे, यशवंतराव अचुतराव सावंत, विलास शामराव साळुंखे,  प्रणिता भगिरथ भालके, प्रविण रामचंद्र भोसले, व्यकटराव चंद्रकांत भालके, संतोष ज्ञानेश्‍वर गायकवाड, बाळासो कृष्णा गडदे, अशोक मुरलीधर शिंदे, पोपट दत्तू शिंदे, निवास कृष्णा भोसले, नयना अशोक शिंदे, संभाजी शिवाजी पाटील, बंडु विठ्ठल मोरे, बाळु शिवाजी मोरे, सचिन नामदेव मोरे, रामहरी ज्ञानेश्‍वर मोरे.
 कासेगांव गटातून विजयसिंह बाळासो देशमुख, पांडुरंग गणपत भुसे, कृष्णा सोपान चव्हाण, संभाजी शंकर पाटील, दगडू निवृत्ती हाके, सुभाष वसंतराव भोसले, योगेश दगडू हाके, बाळासो दगडू आसबे, दशरथ दत्तू जाधव, हेमतंकुमार प्रकाशकुमार पाटील, संजय विठ्ठल रोंगे, श्रीमंत शामराव देशमुख, प्रशांत आण्णासो देशमुख, भानुदास मल्हारी माने,
सहकारी संस्था मधून विठ्ठलचे बाळासाहेब महादेव पाटील, प्रणिता भगिरथ भालके, विलास विष्णू देठे, व्यंकट्येश चंद्रकांत भालके, दशरथ पंढरीनाथ खळगे, महिला गटातून राजश्री पंडीत भोसले, प्रफुल्लता पांडुरंग पाटील, सुनिता विलासराव साळुंखे, प्रणिता भगिरथ भालके, विजया नंदकुमार पाटील, मनिषा हणमंत पवार, उषाताई वसंत चव्हाण, वंदना महादेव चव्हाण, शांता बबन नाईकुडे, सुशिला दगडू भुसनर, प्रमिला धनाजी घाडगे, विजयालक्ष्मी रामहरी रणदिवे, रंजना महादेव साळुंखे पाटील, सुनंदा हणमंत पवार, सुरेखा रामदास रोंगे, फुलाबाई शशिकांत पाटील. इतर मागास वर्गीय गटातून शंकर दगडू गायकवाड, धोंडीबा संतू वाघमारे, नारायण महादेव जाधव, अभिषेक अभयकुमार पुरवत, सुदाम दत्तू माने.
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गमधून कांतिलाल नारायण गलांडे, विलास मोती गोफणे, हेमंतकुमार प्रकाशराव पाटील, जनाबाई दगडू हाके, तानाजी भिमराव भुसनर, शालिवाहन भागवत कोळेकर, प्रविण विक्रम कोळेकर, दगडू निवृत्ती हाके, दगडू दिगंबर भुसनर, सुधिर नारायण अभंगराव.
अनुसूचित जाती जमाती गटातून धोंडीराम शंकर पाटोळे, शहाजी नारायण घोडके, शहाजी भगवान अडगळे, सिताराम तायाप्पा गवळी, गोपाळ कृष्णा गायकवाड, प्रितम बाळु लोंडे, नवनाथ  गणपत लोखंडे, रविंद्र नवनाथ लोखंडे आदींचा बुधवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांमध्ये समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  गुरूवार दि. 9 जून हे एकच दिवस शिल्लक आहे. यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 21 जागेसाठी नेमके किती उमेदवारी अर्ज दाखल होतील हे स्पष्ट होणार आहे.