*रक्षिता जाधव हिने मिळवले बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन.....!* *अवघ्या बाराव्या वर्षी चेस मधील आंतरराष्ट्रीय मानांकन*
:-करकंब/प्रतिनिधी
करकंब पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हे. कॉ. आर आर जाधव यांची कन्या रक्षिता रमेश जाधव हिने शालेय शिक्षण घेत मे 2022 या वर्षीच्या सांगली येथे झालेल्या ऑल इंडिया क्लासिकल चेस टूर्नामेंट मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी बुद्धिबळ स्पर्धेत (चेस मधील) आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करून मोठे यश प्राप्त केले आहे.त्यामुळे रक्षिता रमेश जाधव विजय सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
रक्षिता रमेश जाधव ही शिवरत्न सी बी एस सी स्कूल धवल नगर अकलूज मध्ये इयत्ता आठवी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत- घेत रक्षिता जाधवने यापूर्वी सोलापूर सांगली कुपवाड कोल्हापूर सातारा पुणे औरंगाबाद कराड फलटण नागपूर जेजुरी अकलूज आदी झालेल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत प्राविण्य मिळवलेले आहे.
या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डिसेंबर 2018 पासून खेळत अवघ्या चार वर्षांमध्ये मे 2022 मध्ये कठोर परिश्रम करून शाळेच्या अभ्यासाबरोबरच बुद्धिबळाचा अभ्यास व प्रशिक्षण करत जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पारितोषिक मिळवून मोठे यश मिळवले आहे.
सध्या महाराष्ट्र पहिली ग्रँड मस्टर चेस स्पर्धा बालेवाडी पुणे येथे खेळत असून या स्पर्धेपूर्वी तिला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेले तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.