*प्राथमिक शिक्षण मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे कल्याण काळे* *रायझिंग स्टार पब्लिक स्कूल येथे प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ*
पंढरपूर/प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भविष्याचा पाया असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परिपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी रायझिंग स्टार पब्लिक स्कूल कटिबद्ध राहील असे मत काळे यांनी व्यक्त केले ते रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रिया शुभारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना म्हणाले की सहकार शिरोमणी वसंतराव यांचे स्वप्न होते ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक शिक्षण मिळावा त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी बालपणापासूनच आपल्या परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची सोय होण्यासाठी या संकुलाचा फायदा होणार आहे
*यावेळी संस्थेचे संचालक महादेव नाईकनवरे सचिव बाळासाहेब काळे ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल योगेश काळे डॉ. अजित काळे नंदकुमार काळे निलेश काळे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक अतुल काळे, डॉ. विष्णू जाधव, दीपक सुरवसे, राजेंद्र कौलगे ,संजय घाटे, संतोष सुरवसे, डॉ.कमलकिशोर काळे, सिद्धनाथ पासले वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य शिक्षक बंधू भगिनी व पालक उपस्थित होते*
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सिपल गीतांजली खाडे यांनी केले प्रास्ताविकात बोलताना त्या म्हणाल्या की स्पर्धेच्या युगात मुलं टिकून राहण्यासाठी मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याबरोबरच कृतीयुक्त शिक्षण देण्यावर भर राहणार असून मुलांचं उज्वल भवितव्य घडवण्याची जबाबदारी शैक्षणिक संकुलाची आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहशालेय उपक्रम व डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून कृतियुक् कृतीयुक्त शिक्षण हे केंद्रस्थानी ठेवून मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत
*प्रवेश शुभारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले* .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय कुलकर्णी यांनी मानले