*करकंब येथीलग्रामदैवत कनकंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न*

*करकंब येथीलग्रामदैवत कनकंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न*

करकंब /प्रतिनिधी:-
*दिनांक 16/4/2022 रोजी चैत्र पौर्णिमेला पहाटे सहा वाजता देवीचा अभिषेक घालून सुरुवात करण्यात  आली. संध्याकाळी सहा वाजता देवीच्या पालखीची छबिना वाजत गाजत गावातून मंदिर ते एसटी स्टँड शुक्रवार पेठ ते धाकटी वेस आतार चौक सोमवार पेठ देशमुख वाड्यामध्ये मानकरी* *ट्रस्टचे अध्यक्ष  अमरसिंह देशमुख व उज्ज्वलसिंह देशमुख यांच्या वाड्यामध्ये देवीची यथोचित पूजा करून आरती करून छबिन्या ची सांगता झाली*
*दिनांक 17/4/2022 रोजी देवीच्या भेदी गाण्याचा कलगीतुरा कार्यक्रम पूर्ण झाला* 
*दिनांक 18/4/2022 रोजी जंगी* *कुस्त्यांचे आयोजन करून आखाड्याचे उद्घाटन  अशोकसिंह देशमुख व* *मारुती व्यवहारे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून कुस्तीस सुरुवात करण्यात आली पैलवान प्रवीण भोसले भोसे रोहित ठोंबरे अकलूज या मल्लाला भोसले यांनी यांनी चितपट करत निकाली  कुस्ती करून कनकंबा केसरीचा मान पटकावला यात्रा पंच कमिटीचे उद्योजक अमोल शेळके व अजितसिंह देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले* 
*दिनांक 19/4/2022 रोजी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले त्याचे उद्घाटन प्राध्यापक सतीश देशमुख उदयसिंह निकम दिलीप शेटे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून ऑर्केस्ट्रा सुरुवात करण्यात आली*
*दिनांक 20 /4/ 2022 रोजी लावण्या दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल पुरवत  , करकंब  पोलीस ठाण्याचे पोलीस बीट अंमलदार कैलास हरिहर , संदीप गिरमकर  यांच्या हस्ते नारळ फोडून लावण्य दरबार या महिलांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यात्रा यशस्वी करण्यासाठी पंच कमिटीचे श बाजीराव खाडे शिवाजी* *सलगर रमेश खारे राजेंद्र खारे jपांडुरंग शेटे संतोष शेटे भिमराव मदने विलास धनवे महबूब बागवान फिरोज कोरबू शरद लोंढे सुभाष गुळमे हरिभाऊ देशमुख विष्णुपंत देशमुख यात्रा यशस्वी करण्यासाठी करकंब मधील बहुसंख्य ग्रामस्थांनी सहकार्य केले*