पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या निलंबनाची मागणी* *पंढरीत आठवले गट रिपाईंचे घंटानाद आंदोलन*
पंढरपूर (प्रतिनिधी)
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत असलेले , पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे पुनः एकदा चर्चेत आले आहे. वसुलीतून कमाई आणि त्यातूनच चाललेली मनमानी यामुळे येथील वसुलदार आणि पोलीस अधिकारी भस्मे चर्चेत आले आहेत. या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाईच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी हलगीनाद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत बोलताना रिपाईच्या युवक आघाडीचे राज्य संघटन सचिव, दीपक चंदनशिवे यांनी धक्कादायक खुलासा केला. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणारे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि पोलीस कर्मचारी गणेश काळे यांनी ठाण्यात मनमानी कारभार चालविला आहे. भस्मे यांनी येथील कारभार घेतल्यापासून, या पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उत आला आहे. या हद्दीतील जुगारी, मटकाकिंग , वाळूचोर , अवैध दारू विक्रेते अशा लोकांबरोबर , त्यांचे संबंध दृढ झाले आहेत. या पोलीस ठाण्याचा वसुलदार गणेश काळे आणि पोलीस निरीक्षक भस्मे यांनी करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. ज्यांच्याकडून हा पैसा मिळतो , त्यांचे हितसंबंध जोपासणे हाच एककलमी कार्यक्रम या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याने राबविला आहे. अशा मनमानी कारभारातून आजवर त्यांनी सवर्ण आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. यातूनच अनेक दलित बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा मनमानी आणि भ्रस्ट कारभार करणाऱ्या पोलीस कर्मचारी गणेश काळे आणि अधिकारी प्रशांत भस्मे यांची खातेनिहाय चौकशी करून, निलंबनाची कारवाई करण्याची मागणी , जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे करण्यात आली आहे. ही कारवाई न झाल्यास पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ११ वाजता, हालगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती चंदनशिवे दिली आहे.
चौकट
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे , तसेच पोलीस कर्मचारी गणेश काळे यांनी पोलीस ठाण्यात मनमानी कारभार चालविला आहे. अवैध धंदेवाल्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी दलित समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा खळबाळजनक आरोप करण्यात आला आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करून, निलंबन करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासाठी रिपाइंचे राज्य संघटन सचिव दिपक चंदनशिवे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील तहसील कार्यायासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.