राज्यात ओबीसींवरील अन्याय विरोधात  आता लढा उभारणार* --------------------------------- *आ. गोपीचंद पडळकर यांची घोषणा* ---------------  ----------------- *पंढरपूर शहरातून दिवसभर गाड्यांचा ताफा अन घोंगडी बैठका यामुळे ओबीसी वर्गाला मिळाले मोठे बळ* 

राज्यात ओबीसींवरील अन्याय विरोधात  आता लढा उभारणार* --------------------------------- *आ. गोपीचंद पडळकर यांची घोषणा* ---------------  ----------------- *पंढरपूर शहरातून दिवसभर गाड्यांचा ताफा अन घोंगडी बैठका यामुळे ओबीसी वर्गाला मिळाले मोठे बळ* 

पंढरपूर (प्रतिनिधी)

 महाराष्ट्र राज्यात ओबोसी समाजावर अन्याय होत आहे. सुप्रीम कोर्टाने या समाजास झटकताच , ना.अजित पवार यांनी तात्काळ सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नत्याही केल्या .सरकारची ही भूमिका अन्यायकारक असून, राज्यातील ओबीसी समाजास न्याय देण्यासाठी या सरकारला आपण भाग पाडू असा इशारा आ.गोपीचंद पडळकर यांनी दिला. ओबीसी समाजाने आता संघटीत व्हावे, असे आवाहनही केले. पंढरपूरमध्ये ओबोसी समाजाच्या बैठकीत बोलत होते.


याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस माऊली हळणवर, ओबीसी भटक्या विमुक्त जनमोर्चाचे प्रदेश युवक अध्यक्ष शरद कोळी , सदानंद झांबरे आदी उपस्थित होते.

राज्यातील ओबीसी बांधवांना पदोन्नतीमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे आरक्षण , सुप्रिम कोर्टाने रद्दबातल ठरविले आहे. याचा फटका राज्यातील अठरा पगड जातींना बसला आहे. या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. राज्यातील या समाज बांधवांना संघटित करून , हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात आली. मंगळवार दि. १५ जून रोजी ओबीसी समाजातील अठरा पगड जातींच्या घोंगडी बैठका घेण्यात आल्या.

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण विषयक सुनावणी सुरू असताना, एकाही सुनावणीस राज्य सरकारचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत. हे आरक्षण टिकवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न सरकारकडून केले गेले नाहीत. या उलट सुप्रीम कोर्टाने निकाल देताच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीची काही पदे भरून टाकली, यावरूनच ना. अजित पवार ओबीसी बांधवांचे हित पाहत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी सर्व समाज बांधवांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मतही आ. गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

: चौकट

 विठ्ठल रुक्मिणीचे   दर्शन घेऊन केली अनेक ठिकाणी  घेतल्या घोंगडी बैठक!
--------     -------------- -----

विधानपरिषद आ. गोपीचंद पडळकर यांनी पंढरीतील विविध जातीच्या लोकांशी चर्चा विनिमय करण्यासाठी मंगळवारी दिवसभर विविध भागात जाऊन  घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी ते सांगली जिल्ह्यातील झरे या ठिकाणाहून सकाळी सहा वाजता पंढरपूरकडे निघाले . सुरुवातीला सकाळी आठ वाजतायेथील विठ्ठल रुक्मिणीचे नामदेव पायरीपासून दर्शन घेऊन दिवसभर ठरल्या वेळेप्रमाणे 18 ठिकाणी बैठीत हजर राहून ओबीसींना आता लढा उभा करावा लागणार असून यासाठी सर्वांची साथ महत्वाची असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
    या घोंगडी बैठकीसाठी सकाळी 9 वाजता दालेगल्ली येथे तेली समाजाची बैठक. .9:30वाजता कुंभार गल्ली येथे कुंभार समाजाची बैठक तर10 वाजता कैकाडी समाजाची बैठक घेण्यात आली..तर सकाळी10:30 वाजता त्याच परिसरातल्या वडार समाजाची बैठक पार पडली..
  सकाळी11वाजता गोसावी गल्लीतील गोसावी समाज तर 11:30 वाजता अनिलनगर भागातील काशिकापडी समाज बैठक घेऊन 12वाजता नरहरी सोनार मठात सोनार समाजाची बैठक घेन्यात आली.
    दुपारी12 :30वाजता घडशी गल्ली येथे घडशी समाज तर भक्ती मार्ग शिवरत्न नगर याठिकाणी दुपारी एक वाजता डवरी समाज बैठक होणार आहे.दुपारी एक ते 3 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे भोजन आणि थोडी विश्रांती घेऊन नंतर 3वाजता संत सेना महाराज मठात नाभिक समाज तर 3:30 वाजता भाजनदास चौक येथील गवळी समाज मठात गवळी समाजाची बैठक ,तर चार वाजता गुरव समाज मठात गुरव समाज तर4:30 वाजता लोणार समाज मठात लोणारी समाजाची बैठक पार पडली  आहे.तसेच 5 वाजता सांगोला रोड वरील मोरेमहाराज मठ येथे गोंधळी समाज तर सायं 5:30 वाजता संत सावता माळी मठ येथे माळी समाजाची बैठक घेऊन, कालिका देवी चौक येथे कासार समाज बैठक6वाजता उरकून ,6:30 वाजता स्टेशनवर रोडवरती असलेल्या बुरुड समाज मठ येथे बुरुड समाज बैठक झाली . सायं सात वाजता  येथील संत गाडगेबाबा मठ येथे परीट समाजाची बैठक  उरकून.इतर जातीच्या लोकांशीही  जवळपास रात्री10 नंतरही बैठक घेण्यात आली,शासकीय विश्रांमगृह येथे मुक्कामी राहून आ. पडळकर आपली  पुढील दिशा ठरवली आहे.