*आ.अभिजीत पाटील यांचेकडून शेतकऱ्यांना धीर* *वादळी वाऱ्यामुळे नुकसान  झालेल्या पिकांची केली पाहण *मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टें, गारअकोले, आलेगाव बु. येथे भेटी दिल्या.*

*आ.अभिजीत पाटील यांचेकडून शेतकऱ्यांना धीर*  *वादळी वाऱ्यामुळे नुकसान  झालेल्या पिकांची केली पाहण  *मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टें, गारअकोले, आलेगाव बु. येथे भेटी दिल्या.*

पंढरपूर/प्रतिनिधी 

 आपल्या मतदारसंघांमध्ये कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास  ताबडतोब हजर राहून संबंधितांना धीर देण्याचे काम माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत पाटील यांनी केल्याचे आजवर दिसून आले आहे.. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना भेट देण्याचे काम त्यांनी केले आहे..

अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून  शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले..

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देत आज सकाळपासून आमदार पाटील हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरकारकडे सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.