*वाखरी गटातून मोनिका काळे यांची उमेदवारी दाखल*

*वाखरी गटातून मोनिका काळे यांची उमेदवारी दाखल*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटातून सहकारी शिरोमणी वसंतराव काळे यांच्या सुनबाई सौ. मोनिका समाधान काळे  यांचा मोटार सायकल रॅली काढत महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
    
यावेळी वाडीकरोली गावासह वाखरी जिल्हा परिषद गटातील अनेक माता-भगिनी युवक कार्यकर्ते व जेष्ठ पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. 
 जिल्हा परिषद गटातील महिला सक्षमीकरण पाणीपुरवठा आरोग्याच्या सुविधा गाव खेड्यातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षण या गोष्टीचे व्हिजन घेऊन या निवडणुकीला मी सामोरी जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.