*मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा धुमधडाका*! *खर्डी येथील जागृत देवस्थान सीताराम महाराज यांचे दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ*
पंढरपूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. विविध राजकीय पक्षाकडून आपापल्या उमेदवाराची चचपणी आणि घोषणा करण्याचे काम सुरू आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसेचा उमेदवार म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी जागृत देवस्थान असलेल्या खर्डी येथुन सीताराम महाराजांचे दर्शन घेत. प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून, दिलीपबापू धोत्रे यांनी मतदारसंघातील विविध भागातील मनसे, पदाधिकारी, कार्यकर्ते , मित्र परिवार हितचिंतकांनी या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मनसेचा उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.त्यासाठी गावागावात कार्यकर्त्यांची फौज तयार ठेवली आहे.
निवडणूक काळातील एक भाग म्हणून गुरुवारी नवरात्र उत्सव व घटस्थापना या शुभ मुहूर्तावर मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे श्रध्दास्थान संत सिताराम महाराज यांच्या खर्डी येथिल मंदिरात श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ अर्पण करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी अनेक महिला, युवा,युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना धोत्रे यांनी भावनिक होत, आपल्या भाषणातून ,मी एक गरीब दगड फोड्याचा मुलगा आहे. त्यामुळे गरिबी काय असते. याची जाणीव आहे. मी कोणत्याही राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबातून आलो आहे असे सांगितलं . या प्रचार सभेत त्यांनी सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. महिला व युवकांसाठी मनसे तर्फे विविध माध्यमांतून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजातील सर्व सामान्य महिला वर्ग यांना स्वबळावर उद्योग, व्यवसायसाठी मनसे तर्फे विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिलीप धोत्रे यानी दिले . शेतकरी,कष्टकरी,तरुण बेरोजगारांच्या समस्या कायमची संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
या खर्डी येथील प्रचार
सभेस प्रमुख उपस्थित नाना कदम,वकील यासीन शेख ,शशीकांत घाडगे,संतोष कवडे, संतोष रणवरे,अमर कुलकर्णी, अनिल केदार,राजु बाबर,गणेश पिंपळणेकर,नागेश इंगोले, दत्तात्रय वलेकर, बाबा चव्हाण, प्रशांत बंडगर, औदुंबर शेळके तसेच मनसेचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.