*धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या  विजयासाठी पंढरीत मोठा जल्लोष*

*धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या  विजयासाठी पंढरीत मोठा जल्लोष*

पंढरपूर/प्रतिनीधी 

सोलापूर  मतदार संघातून आ.प्रणितीताई शिंदे आणि माढा मधून धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झालेबद्दल पंढरीतील महाविकास आघाडी आणि मोहिते पाटील समर्थक यांचेकडून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठी फटाक्याची आतिषबाजी करीत वरील दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी घोषणा देण्यात आल्या.
   या झालेल्या जल्लोषामध्ये  विजय प्रताप युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष दीपक वाडदेकर, निवडणूक मॅनेजमेंट गुरू उद्योजक हिम्मतराव आसबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, शहर अध्यक्ष सुभाष भोसले, अभिजीत पवार, बशीर शेख,अनिल सप्ताल, सतीश चव्हाण, गोपी वाडदेकर, जगदीश पवार, निलेश शिंदे, सिकंदर कबाडे, प्रशांत कबाडे, अजित पवार, चारुशीला कुलकर्णी, दादासाहेब बोडके, रौफ बागवान, विनायक चव्हाण, अमित पवार, कुमार बिडवे, गोपी फावडे, वनिता बनसोडे, मुस्ता इनामदार, विक्रांत आसबे, सयाजी आसबे, धनंजय जाधव, यांचेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.