*चेअरमन कल्याणराव काळे यांची टीम बारामतीत घुसणार* *महायुतीचे उमेदवार सूनेत्राताई पवार यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी घेतली समर्थक बैठक*

*चेअरमन कल्याणराव काळे यांची टीम बारामतीत घुसणार*  *महायुतीचे उमेदवार सूनेत्राताई पवार यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी घेतली समर्थक बैठक*

पंढरपूर/प्रतिनीधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण पतसंस्था पंढरपूर येथे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघामधे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या उमेदवार  सौ सुनेत्राताई  पवार यांच्या प्रचाराबद्दल चर्चा करण्यात आली.

या नियोजन बैठकीचे वेळी  सहकार शिरोमणी परिवार व राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर तालुका मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सहकार शिरोमणीचे संचालक  उपस्थित होते.
आपल्या पंढरपूर भागातील काही कार्यकर्त्यांचे बारामती मतदार संघातील पाहुणे व मित्र परिवार यांच्या भेटी घेऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.आपल्या उमेदवार सुनेत्राताई पवार  याना मतदान करण्यासंदर्भात प्रचार करण्याच्या सूचनाही चेअरमन कल्याणराव काळे  यांनी दिल्या आहेत.
 या बैठकीला राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान  काळे, महादेव देठे, सहकार शिरोमणीचे  व्हा. चेअरमन भारत  कोळेकर, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई शिंदे ,सहकारी शिरोमणी साखर कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,कामगार,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.