*संभाजी ब्रिगेड पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन जगताप यांची फेरनिवड.* *जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल केला विशेष सन्मान व सत्कार*
करकंब /प्रतिनिधी
:-संभाजी ब्रिगेडच्या पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवश्री सचिन जगताप यांची फेर निवड झाल्याबद्दल करकंब येथील अजित सिंह देशमुख मित्र मंडळ व सोलापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा केदार मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक अशोक सिंह देशमुख, एडवोकेट दिलावर कडगे, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष ऋषिकेश करंडे, उद्योगपती वैभव राजे शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब वागज, प्रगतशील बागायतदार अमरसिंह महाडिक, किरण कोरके, नितीन सुर्वे सर, बिलाल शेख, आदी सह मित्रपरिवार करकंब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.