*माळेवाडी बोरगाव मधील त्या घटनेचा पंढरीतही निषेध* *दलित महासंघाच्या तालुका महिला अध्यक्ष छाया पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील येथे दिले निवेदन* *पीडित कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला ईशारा*
पंढरपूर:-प्रतिनिधी
मागील आठवड्यामध्ये माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाजाचे धनाजी साठे यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या प्रेताची अवहेलना करण्यात , त्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील दलित महासंघाच्या वतीने महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष छाया पवार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात एक निवेदनही देण्यात आले.
या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये, ज्या लोकांनी अशाप्रकारचे वाईट कृत्य केले आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, या लोकांना पाठीशी घालणाऱ्या त्या पोलीस अधिकारावर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, या कुटूंबियांना सरकारने25लाख रुपये मिळवून देण्याची तरतूद करावी अशा विविध मागण्यांसाठी वरील निवेदन देण्यात आले,
वरील देण्यात आलेल्या विषयावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या देण्यात आलेल्या निवेदनावर पंढरपूर तालुका दलित महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष छाया पवार, तालुका अध्यक्ष अमोल खिलारे,प्रदेश सचिव डी के साखरे, गणेश सुरवसे, आदींच्या सहया आहेत.