*पंढरपूर न .पा. च्या  आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची   एकसंघपणे व्यूहरचना*... *पंढरपूर शहर राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय*.. *सत्ताधारी विरोधात असलेल्या प्रचंड असंतोषचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी महाविकास आघाडी तयारीत*

*पंढरपूर न .पा. च्या  आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची   एकसंघपणे व्यूहरचना*...  *पंढरपूर शहर राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय*..  *सत्ताधारी विरोधात असलेल्या प्रचंड असंतोषचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी महाविकास आघाडी तयारीत*

पंढरपूर / प्रतिनिधी 
पंढरपूर नगरपालीकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबत धोरण ठरविण्यासाठी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील ,व्यापार व उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशराव फाटे ,युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश पाटील,तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख व माजी तालुकाध्यक्ष ॲड.दीपकदादा पवार,शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे,रणजित पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.
याबैठकीत आपले हेवेदावे बाजूला ठेऊन सर्वजण एका विचाराने एकत्रित येवून न.पा.निवडणूकीस सामोरे जाण्याचे धोरण ठरविण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना कल्याणराव काळे म्हणाले की पुढील काळात महाविकासआघाडीतील सर्वांना विश्वासात घेवून आपण तयारीला लागावे असे सांगून  काळे पुढे म्हणाले की सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे काम करावे.

   पंढरपूर नगर पालीकेतील सत्ताधारी सध्या शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना शहरवासियांकडून नेहमीच विरोध होत आहे.
शहराच्या विकासाबाबत पालीकेतील सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.हाच मुद्दा घेऊन येणारी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असल्याचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी सांगितले.
या बैठकीस युवकचे जिल्हाउपाध्यक्ष बापू शिंदे, शहराध्यक्ष स्वप्निल जगताप,ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, संकेत ढवळे,शहर उपाध्यक्ष गिरिष चाकोते,सचिन कदम,सचिव सचिन आदमिले,सरचिटणिस रशिद शेख,दत्तात्रय माने,तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे त्याचप्रमाणे युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगिता माने,सुनंदा उमाटे,प्राजक्ता परचंडराव व सारिका गायकवाड  यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.