*करकंब येथील रोटरी क्लबच्या वतीने चंद्रभागा हॉस्पिटल मध्ये १७० रुग्णांची मोफत तपासणी.* *मोतीबिंदूचे ४५ रुग्ण.* 

*करकंब येथील रोटरी क्लबच्या वतीने चंद्रभागा हॉस्पिटल मध्ये १७० रुग्णांची मोफत तपासणी.*   *मोतीबिंदूचे ४५ रुग्ण.* 

करकंब/ प्रतिनिधी  :-  

रोटरी क्लब ऑफ करकंबच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात १७० जणांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे दिसून आले.
   मंगळवार दिनांक- २ मे रोजी करकंब येथील चंद्रभागा हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्र तपासणी, मधुमेह रक्तदाब, सांधेदुखी व स्त्रीरोग निदान शिबिर घेण्यात आले.
   शिबिराचे उद्घाटन- करकंब रोटरी क्लबचे अध्यक्ष- रोटरीयन रघुनाथ जाधव, नेत्रतज्ञ डॉ-रणजीत कदम, रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ- प्रशांत कुमार मोरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
   यावेळी सचिव -डॉ. अक्षय मोरे,  सहाय्यक -सागर कोळेकर, दत्तात्रय करडे, ऋतुजा बाबर , रोटरीचे माजी अध्यक्ष -धनंजय इदाते, डॉ-विनोद शिंगटे,सुनील दुधाणे, विकास शहा, सुनील अडगळे, रोटरियन छाया मोरे, डॉ- सरस्वती मोरे, लक्ष्मण जाधव, वरूण पुरवत ग्रामस्थ व नेत्र रुग्ण उपस्थित होते. या शिबिरात १७० रुग्णांपैकी ४५ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे दिसून आले. तसेच ६८ रुग्णांना संधिवात तर १५ रुग्णांना मधुमेह असल्याचे तपासणी दिसून आले. त्याचप्रमाणे रक्तदाब(बीपी) तपासणी यावेळी करण्यात आली. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना गुरुवार दिनांक ४ मे रोजी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर, पुणे येथील नेत्र रुग्णालयात पाठविले जाणार आहे. या शिबिरासाठी संदीप मोरे,  विशाल मोरे, विश्वजीत मोरे, सानिका काळे तसेच सर्व रोटरीयन यांनी विशेष परिश्रम घेतले.