*करकंब येथे महात्मा हंसराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.*
.
करकंब/ प्रतिनिधी :-
करकंब तालुका पंढरपूर येथील डीएवी शैक्षणिक संकुल अंतर्गत रामभाऊ जोशी हायस्कूल व डिएव्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेज येथे प्राचार्य हेमंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा हंसराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रथम महात्मा हंसराज यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामभाऊ जोशी हायस्कूलचे मराठी विभाग प्रमुख प्रा सुरेश दहिगरे यांनी महात्मा हंसराज यांनी आयुष्यात केलेल्या विविध सामाजिक कार्याबाबत सविस्तर माहिती दिली डीएवी शिक्षण संस्था स्थापन करण्यात महात्मा हंसराज यांचा मोलाचा सहभाग होता महात्मा हंसराज हे संस्थेने स्थापन केलेल्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते खूप मोलाचे शिक्षण कार्य केले असून आर्य समाजाचे विचार समाजामध्ये प्रसारित करण्याचे महत्वपूर्ण काम केल्याचे श्री दहिगिरे यांनी सांगितले कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे, स्काऊट मास्टर एम के पुजारी, विनय कुलकर्णी, नरसिंह एबोते, नागेश घुले, अभिषेक चोपडे, संजय पंचवाडकर संजय पाटील, मिथुन चंदनशिवे, प्रा माने,प्रा गणेश गायकवाड प्रा. ज्योती पवार, मनीषा ढोबळे, अश्विनी शिंगटे यांचे सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अभंगराव यांनी केले.