*सैनिक स्कूल परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे घवघवीत यश* 

*सैनिक स्कूल परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे घवघवीत यश* 


करकंब /प्रतिनिधी. :-

           शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये पायल फाउंडेशन संचलित "एस.पी. पब्लिक स्कूल, नांदोरे" या प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
 या परीक्षेसाठी प्रशालेमधील एकूण 9 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वच 9 विद्यार्थी यामध्ये पात्र झाले. 
यामध्ये जयदीप दिगंबर पाटील 224 गुण, अथर्व जयसिंग गायकवाड 211, वेदांत संतोष वलगे 208 ,सिद्धांत संजय भिंगारे 168, पूजा सतीश सुतार 154, दानवी जयवंत नरसाळे 144, प्रणाली सुधीर भोसले 138, कल्याणी हनुमंत उलभगत 135 व  पायल अनिल सुरवसे हिने 135 गुण मिळवून हे संपादन केले. 
       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष - डॉ.संतोष वलगे, उपाध्यक्ष डॉ.नंदकुमार होनराव, सचिव अश्वराज वाघ,खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण ,उपमुख्याध्यापक सुरज अलगुडे यांनी केले. 
यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी, सोमनाथ ढावरे, वासंती वलगे ,स्वाती चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .या यशाबद्दल प्रशालेचे तसेच विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.