*प्रहार दिव्य क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश.* *लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित....!*
करकंब /प्रतिनिधी
आज दिनांक 28/ 9 /2022 रोजी संजय गांधी ऑफिस व पंचायत समितीला टाळे ठोकण्याच्या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर वेळेत येऊन संजय गांधी ची रक्कम तहसीलदार यांचे खात्यावर आल्यावर आठ दिवसात लाभार्थ्याच्या खात्यावर मिळतील .असे आश्वासन देऊन हेआंदोलन स्थगित करण्यात आले . तसेच पंचायत समिती कार्यालयासही टाळ्या ठोकण्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने या आंदोलनाला पंढरपूरचे गटविकास अधिकारी म प्रशांत काळे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने सर यांच्या उपस्थितीत लेखी निवेदनाद्वारे पंधरा तारखेपर्यंत मुदत देऊन शंभर टक्के पंढरपूर तालुका ग्रामपंचायत दिव्यांग पाच टक्के निधी पूर्ण होईल .असे लेखी पत्र दिल्यामुळे हे आंदोलन स्थगिती करण्यात आले .
यावेळी प्रहार दिव्य क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले , जिल्हा सचिव संजय जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख हनुमंत चव्हाण, तालुकाध्यक्ष उमेश गोडसे, उपाध्यक्ष दत्ता जमदाडे, शहराध्यक्ष सुनिता लवंड, करकंब शहराध्यक्ष महेंद्र लोंढे, बाळू पेटकर, दत्ता धायगुडे, संतोष पवार, हनुमंत आटकळे, सागर अष्टेकर, ज्ञानेश्वर गायकवाड पदाधिकारी सह प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते.