*प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पंढरपूर पंचायत समितीला व तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा...!* *ग्रामपंचायतच्या वार्षिक निधीतून पाच टक्के निधी दिव्यांगांना अदा करण्याची मागणी.*
करकंब /प्रतिनिधी
:-सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नातून पाच टक्के दिव्यांगाना निधी राखून ठेवून तो निधी दिव्यांगाना वाटपाचे नियोजन असतानाचे जीआर असतानाही आत्तापर्यंत ग्रामपंचायतने निधी वाटप केले नाही. तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये दिव्यांगांची फसवणूक होते. यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाला दिनांक:- 28/9/2022 रोजी टाळे ठोकण्याचा इशारा सोलापूर जिल्हा अध्यक्ष-दत्तात्रय चौगुले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष- दत्तात्रय चौगुले,पंढरपूर तालुकाध्यक्ष-उमेश गोडसे, पंढरपूर तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष -गजानन नेवासकर, पंढरपूर शहराध्यक्ष-गणेश ननवरे, करकंब शहराध्यक्ष-महेंद्र लोंढे, अजित चिद्रेवार (उंबरे पागे), अध्यक्ष हनुमंत आटकळे तसेच दिव्यांग महिला आणि बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.