*करकंब येथे जागर स्वच्छता अभियान टीमने दुर्गंधीयुक्त रस्ता केला चकाचक...!* *दत्त मंदिर ते रोहिदास नगर -देशमुख गल्ली - बाजार तळ रस्ता केला स्वच्छ.*

*करकंब येथे जागर स्वच्छता अभियान टीमने दुर्गंधीयुक्त रस्ता केला चकाचक...!*   *दत्त मंदिर ते रोहिदास नगर -देशमुख गल्ली - बाजार तळ रस्ता केला स्वच्छ.*

करकंब /प्रतिनिधीं. :-

करकंब येथे आज जागर स्वच्छता अभियान टीम यांनी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये दत्त मंदिर ते रोहिदास नगर-देशमुख गल्ली-बाजारतळ या  प्रमुख रस्त्यास जोडणाऱ्या मुख्य अंतर्गत असलेल्या रस्त्यावर आणि रस्त्यालगत असलेल्या प्रचंड दुर्गंधीच्या व घाणीच्या आणि कचऱ्याची स्वच्छता करून ही सर्व घाण व कचरा ग्रामपंचायत च्या घंटागाडी मध्ये घेऊन पूर्णता हा रस्ता अनेक दिवसापासून दुर्गंधीयुक्त असलेला रस्ता स्वच्छ केला. त्यामुळे या मार्गावरून बस स्थानक संजीवन समाधी मंदिर दत्त मंदिर तसेच बाजार हॉस्पिटल व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी अबाल वृद्ध विशेषतः महिला वर्गातून जागर स्वच्छता अभियान टीमचे कौतुक केले जात आहे.
गेल्या काही दिवसापासून करकंब येथील जागर स्वच्छता अभियान टीम स्वच्छ करकंब... सुंदर करकंब यांनी निस्वार्थ भावनेने करकंब गावात स्वच्छतेचे काम करून दुर्गंधी मुक्त व कचरा मुक्त गाव करण्यासाठी त्याचबरोबर गावातील नागरिकांचे आणि गावात येणाऱ्या वाडी वस्तीवरील लोकांचे अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रचंड मेहनत घेत असल्याचे  येत चित्र दिसून येत आहे.