*70 वर्षातून खासदार तळ्यावर आले...  .साऱ् गाव खडबडून जाग झाले.... खासदार साहेबांनी  कोट्यावधी चा निधी देऊन गेले ....!* *रस्ते.. वीज... आरोग्य.... शेतकऱी .... आणि सामान्यांसाठी धावणारा..... सिंह ....खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

*70 वर्षातून खासदार तळ्यावर आले...  .साऱ् गाव खडबडून जाग झाले.... खासदार साहेबांनी  कोट्यावधी चा निधी देऊन गेले ....!*  *रस्ते.. वीज... आरोग्य.... शेतकऱी .... आणि सामान्यांसाठी धावणारा..... सिंह ....खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


*करकंब/ प्रतिनिधी

:- गेल्या 70 वर्षात माढा लोकसभा मतदारसंघातील लोकसभेवर निवडून गेलेला खासदार प्रचाराला तर सोडाच पण निवडून आल्यानंतरही गावाकडे फिरकत नसायचा... या मतदारसंघातील  निधीची तर दूरची बाब... तसा माढा लोकसभा मतदारसंघातील करकंब सह 42 गावातीलअनेक गावांमध्ये रस्ते विज आरोग्य अशा मूलभूत  गरजांसाठी आमदार किंवा खासदारांची आवश्यकता नसता ना ही हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षात होतं नव्हते. मात्र याला अपवाद असलेले माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून केलेल्या कृतीच्या कामातून दिसून येत असल्याचे या माढा लोकसभा मतदारसंघातील सामान्य जनतेत मधून बोलले जात आहे.*
*मध्यंतरीच्या काळात करकंब येथील शिवकालीन असलेल्या 45 एकर पाझर तळ्यावर (तलावा वर) सत्तर वर्षातून एक खासदार तळ्यावर आला... अन .... साऱ्या गावात बोभाटा झाला...! याच वेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या गाव पाझर तलावाच्या भरीव निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला.आणि पूर्व भागातील अनेक वर्षापासून दुष्काळी भाग असलेला पूर्व भागातील हजारो हेक्टरचा भाग ओलिताखाली येण्याची आशाआता पल्लवीत झाल्या .*
*माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करकंब सह 42 गावातील यापूर्वी मूलभूत सुविधा अंतर्गत तेरा गावांमध्ये  स्ट्रेट लाईट , तसेच प्रत्येकी तीन लाख रुपये प्रमाणे बारा लाख रुपयांचा निधी ,किडनी प्रत्यारोपणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून नुकताच तुळजापूर ते शिखर शिंगणापूर या राज्य महामार्गासाठी मंजुरी मिळवून हे काम त्वरित चालू करण्यासाठी प्रयत्नशील, घोटी ते चांभार विहीर पर्यंत पालखी मार्गासाठी मंजुरी, तसेच करकंब आणि 42 गावातील स्ट्रीट लाईट साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे सर सांगितली.*
*खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या निधीतून बार्डी येथील करकंब रस्ता येथे सहा मीटर वरती 72 व्हॅट एलईडी दिवा बसविणे, जाधव वाडी-शेळके वस्ती येथे सहा मीटर वरती बहात्तर वॅट स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, मेंढापूर-दुग्धेश्वर शॉपिंग सेंटर समोर सहा मीटर 72 व्या स्ट्रीट लाईट एलईडी दिवा, खरातवाडी-देवकाते वस्ती सहा मीटर 72 व्या स्ट्रीट एलईडी दिवा बसवणे, पांढरेवाडी-भोसे वस्ती सहा मीटर वरती 72  स्ट्रीट एलईडी दिवा, सुगाव भोसे-सहा मीटर वरती बहात्तर वॅट स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, नांदोरे-दहा मीटर वरती बहात्तर वॅट फिटिंग 6 मीटर स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, पिराची कुरोली-सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा, देवडे-सहा मीटर वरती 72 वॅट एलईडी दिवा बसवणे, जळवली-सहा मीटर वरती स्ट्रीट एलईडी दिवा, उंबरे-सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, चौकाईवाडी-सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा, बसविणे.*
*तसेच करकंब साठी विशेष बाब म्हणून जाधव साहेब- यांच्या घराजवळ सहा मीटर बहात्तर मीटर स्ट्रीट एलईडी दिवा बसवणे. मगदूम साहेब ट्रस्ट - येथे सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा, बुधवार पेठ- येथे सहा मीटर वरती 72 एलईडी दिवा, रामभाऊ जोशी वस्ती- येथे सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, ज्योतिबा मंदिर- येथे सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा, आदर्श प्रशाला रस्त्यावरती सहा मीटर वरती 72 वॅट स्ट्रीट एलईडी दिवा बसविणे, आदी सह जिम साहित्य या माध्यमातून विविध निधी देण्याचे काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष-सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे सर यांनी सांगितले.*