*करकंब येथे डॉ.देवकते चाईल्ड किल्लिक चे आज उद्घाटन* *35 वर्षाचा वारसा जपण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बाल रुग्णसेवेसाठी रुग्णांच्या सेवेत....!

*करकंब येथे डॉ.देवकते चाईल्ड किल्लिक चे आज उद्घाटन*  *35 वर्षाचा वारसा जपण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बाल रुग्णसेवेसाठी रुग्णांच्या सेवेत....!

करकंब /प्रतिनिधी:-
पंढरपूर येथे गेली ३५ वर्षे ख्यातनाम बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे आपल्याच गावचे करकंब येथील भूमीपुत्र असलेले व त्यांचे ११ पर्यंतचे शिक्षण करकंब येथेच करुन पंढरपूर व परिसरात नावाजलेले बालरोग तज्ञ डॉ . श्रीकांत काशिनाथ देवकते ( एम.डी. बालरोग तज्ञ ) हे आपल्या बालकांची सेवा करण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या सेवेत बालरुग्ण सेवा लवकरच करकंब येथे आतार चौक मेनरोड करकंब येथे “ डॉ . देवकते चाईल्ड क्लिनिक ” च्या स्वरुपात करीत आहेत . रविवार दि . १ ९ / ६ / २०२२ रोजी त्याचे उद्घाटन करीत आहे . त्यांचे चिरंजीव डॉ . ओजस श्रीकांत देवकते व त्यांच्या स्नुषा सौ . प्रेरणा ओजस देवकते हे करकंब येथे लवकरच " देवकते चाईल्ड क्लिनीक " सुरु करत आहेत . डॉ . ओजस यांनी त्यांचे एम.बी.बी.एस. चे शिक्षण मुंबई येथून तर एम.डी. चे शिक्षण औरंगाबाद येथून पुर्ण केले आहे . एम.डी. शिक्षण पुर्ण करुन पुणे येथे निओनेटॉलॉजी ( नवअर्भकशास्त्र ) व पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर ( आय.सी.यु. ) मध्ये फेलोशिप केली आणि मुंबई येथील प्रसिद्ध अशा कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मधुन फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डिओलॉजी केली आहे व लहान मुलांच्या हृदयाच्या आजाराचे अचूक निदान करण्याचे कौशल्य प्राप्त केले आहे .

एवढे उच्च शिक्षण घेतलेले ते सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच बालरोग तज्ञ आहेत . त्यांनी पंढरपूर येथे चिरंजीव हॉस्पिटल मध्ये नवअर्भक विभाग व लहान मुलांचे आय.सी.यु. सुरु केले आहे . अद्यावत सोयी सुविधा युक्त सुसज्ज हॉस्पिटल सुरु केले आहे . आपल्या वडीलांच्या इच्छेखातर एवढ्या उच्च शिक्षणाचा फायदा आपल्या गावातील लोकांना व्हावा . या प्रेरणेने आम्ही करकंब येथे क्लिनिक चालू करीत आहोत . यांच्या रुपाने करकंब येथे प्रथमच एम.डी. बालरोग तज्ञांची सेवा उपलब्ध होत आहे . तरी करकंब येथे आम्ही सुरु करत असलेल्या देवकते चॉईल्ड क्लिनिकला सहकार्य करून आपली सेवा करण्याची संधी करकंब परिसरातील लोकांनी द्यावी. असे डॉ. देवकते परिवार ने सांगितले.