*महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय मुंबई यांच्या वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र भोर जिल्हा पुणे येथे आयोजित प्रशिक्षण संपन्न*

*महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय मुंबई यांच्या वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र भोर जिल्हा पुणे येथे आयोजित प्रशिक्षण संपन्न*

करकंब/ प्रतिनिधी:-
*राज्य प्रशिक्षण संस्था भोर, पुणे येथे आयोजित केलेल्या कब मास्टर, स्काऊट मास्टर बेसिक प्रशिक्षण, स्काऊट मास्टर प्रगत प्रशिक्षण यासाठी विविध जिल्ह्यातील शिक्षकांची निवड करण्यात आली होती.*
            *रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब महादेव पुजारी ठिकाणी स्काऊट मास्तर प्रगत प्रशिक्षण उत्साही व आनंदी वातावरणात पूर्ण केले*
   *विद्यार्थ्यांना राज्यपाल पुरस्कार,राष्ट्रपती पुरस्कार कसे मिळवता येईल त्यासाठी कोणती पद्धत,प्रक्रिया आहे याचे संपूर्ण ज्ञान या प्रशिक्षणाच्या ठिकाणी सांगण्यात आले.राज्यस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय जांबोरी स्पर्धेत कसे सहभागी व्हावे, शिवाय शिक्षकांना पंतप्रधान ढाल कसे मिळवता येईल, या पुढील प्रशिक्षणाचे टप्पे कसे पूर्ण करायचे याही विषयी माहिती व मार्गदर्शन सांगण्यात आले.*
      *या राज्य प्रशिक्षण केंद्रावर रात्रीच्या वेळी आयोजित कॅम्प फायर मध्ये विविध पथकांनी देशभक्तीपर गीत, लोकगीत, लोक नृत्य अशी विविध प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आले होते होते.*
*विविध प्रकारच्या माहिती व मार्गदर्शनाने दि.04/05/2022 पासून10/05/20220या सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.*
     *वरील सर्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रगत स्काऊट मास्तर प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक होतं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.*