आ. गोपीचंद पडळकर यांच्या उद्या पंढरीत अठरा ठिकाणी होणार विविध जातीच्या लोकांशी घोंगडी बैठका !* ------------------------------------- *मंगळवारी सकाळी आठ वाजता येथील विठ्ठल रुक्मिणीचे नामदेव पायरीपासून दर्शन घेऊन होणार सुरवात* ------------------------------------- आ. गोपीचंद पडळकर दिवसभर घोंगडी बैठका संपूनही शासकीय विश्रामगृहावर मुक्काम ठोकणार
पंढरपूर :-प्रतिनिधी
विधानपरिषद आ. गोपीचंद पडळकर यांनी पंढरीतील विविध जातीच्या लोकांशी चर्चा विनिमय करण्यासाठी मंगळवारी दिवसभर विविध भागात जाऊन घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी ते सांगली जिल्ह्यातील झरे या ठिकाणाहून सकाळी सहा वाजता पंढरपूरकडे येणार आहेत. सुरुवातीला सकाळी आठ वाजतायेथील विठ्ठल रुक्मिणीचे नामदेव पायरीपासून दर्शन घेऊन दिवसभर ठरल्या वेळेप्रमाणे 18 ठिकाणी बैठीत हजर राहणार आहेत.

या घोंगडी बैठकीसाठी सकाळी 9 वाजता दालेगल्ली येथे तेली समाजाची बैठक होणार आहे.9:30वाजता कुंभार गल्ली येथे कुंभार समाजाची बैठक तर10 वाजता कैकाडी समाजाची बैठक होणार आहे.तर सकाळी10:30 वाजता त्याच परिसरातल्या वडार समाजाची बैठक होणार आहे.
सकाळी11वाजता गोसावी गल्लीतील गोसावी समाज तर 11:30 वाजता अनिलनगर भागातील काशिकापडी समाज बैठक घेऊन 12वाजता नरहरी सोनार मठात सोनार समाजाची बैठक घेणार आहेत.
दुपारी12 :30वाजता घडशी गल्ली येथे घडशी समाज तर भक्ती मार्ग शिवरत्न नगर याठिकाणी दुपारी एक वाजता डवरी समाज बैठक होणार आहे.दुपारी एक ते 3 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे भोजन आणि थोडी विश्रांती होणार आहे.
यानंतर 3वाजता संत सेना महाराज मठात नाभिक समाज तर 3:30 वाजता भाजनदास चौक येथील गवळी समाज मठात गवळी समाजाची बैठक होणार आहे.चार वाजता गुरव समाज मठात गुरव समाज तर4:30 वाजता लोणार समाज मठात लोणारी समाजाची बैठक पार पडणार आहे.तसेच 5 वाजता सांगोला रोड वरील मोरेमहाराज मठ येथे गोंधळी समाज तर सायं 5:30 वाजता संत सावता माळी मठ येथे माळी समाजाची बैठक होणार आहे. कालिका देवी चौक येथे कासार समाज बैठक6वाजता उरकून ,6:30 वाजता स्टेशनवर रोडवरती असलेल्या बुरुड समाज मठ येथे बुरुड समाज बैठक होणार आहे.
सायं सात वाजता परीट गल्ली येथील संत गाडगेबाबा मठ येथे परीट समाजाची बैठक होणार आहे.यानंतर शासकीय विश्रांमगृह येथे मुक्कामी राहून आ. पडळकर आपली घोंगडी बैठक पार पडणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयाचे वतीने कळविण्यात आले आहे.