*जिल्हा परिषद... पंचायत समिती निवडणुका लांबणीवर.... अन्.. भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा जिव लागला टांगणीवर.....!*

 *जिल्हा परिषद... पंचायत समिती निवडणुका लांबणीवर.... अन्.. भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा जिव लागला टांगणीवर.....!*


 *करकंब /प्रतिनिधी*

:-राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका आता चार ते सहा महिने लांबणीवर गेल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून गेल्या अनेक दिवसापासून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने लोकांशी संपर्क साधून येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती आपणच काबीज करणार म्हणून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा मात्र आता स्वप्न भंगले असून या भावी सदस्यांचा जीव टांगणीवर लागला आहे.*
*नुकताच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा करून महानगर नगरपालिक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्या याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेऊन यापूर्वी केलेल्या रचना रद्द करून पुन्हा नव्याने या रचना करून येत्या चार ते सहा महिन्यात या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजणार असून तोपर्यंत एवढी तयारी करूनही हातातोंडाशी आलेला घास राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे हिसकावून घेतला असल्याची खंत व दुःख नाव न छापण्याच्या अटीवर काही भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी यावेळी बोलून दाखवले.  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या सर्वात लक्षवेधी आणि रंगतदार होणार असून जिल्हा परिषद सदस्या बरोबरच या निवडणुकीमध्ये पंचायत समिती ना महत्त्व प्राप्त झाले होते. पण या निवडणुका लांबल्यामुळे आता पुन्हा नव्याने रचना करून पुढे करायचे काय? अशा दुहेरी कचाट्यात भावी उमेदवार सापडला आहे. असे असले तरी लांबणीवर पडलेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ही प्रचंड अटीतटीची व सर्वात लक्षवेधी आणि रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जाते.*