*साखर कारखानदारीत अपयश मिळालेल्यानी मला शिकवू नये* *राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभात आ. अभिजीत पाटील यांचा काळे यांच्यावर निशाणा*
पंढरपूर/प्रतिनिधी
ज्यांनी चारी दिशांनी चार पक्ष बदलले ,विधानपरिषद व विधानसभेला पडले, सभासदांच्या मालकीचा कारखाना विकला, एक टक्केवारीवर भाड्याने दिला. साखर कारखानदारीत अपयश मिळालेल्यानी मला कारखानदारीतले ऊसदरावर बोलत आहेत . त्यांनी त्यावर कधीच बोलू नये. असा घणाघात करत, चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर आमदार अभिजीत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेंढापूर येथील सभेत आमदार अभिजीत पाटील बोलत होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,निवडून यायची कुवत नाही त्यांनी बोलू नये .आमची लढाई भाजपशी नसून या लोकांशी असल्याचेही आ. अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, ॲड. दिपक पवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची असताना विरोधी गटातील नेते विठ्ठल कारखान्यावर बोलत आहेत. विठ्ठल कारखान्यातील सभासदांचा माझ्यावर विश्वास आहे यामुळे विठ्ठल कारखाना निवडणूक व माढा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्थानिक नेत्याविरुद्ध लढत आहे. मात्र हे नेते माझी लढाई भाजपची असल्याचा अपप्रचार करत आहेत. माझी लढाई भाजपशी नाही तर स्थानिक नेत्यांची असल्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.
मी घराणेशाहीला फाटा देत, शिंदे परिवाराचा ३० वर्षाची सत्ता उलथून टाकली व मायबाप जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी दिली . मी आमदार झालो. आता या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत.
त्यावर बोलावे असा सल्लाही दिला आहे.
रणजीत शिंदे यांना आताही माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर द्यावा. पंढरपूर व माढा तालुक्यातील काही नेते स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असून, ते पालकमंत्र्यांना काड्या लावण्याचे काम करत आहेत. काही राजकीय नेते सभेमधून मी चुकून आमदार झालो ,असे सांगत आहेत. मात्र मी तीस हजार मतांनी होऊन अधिक मताने विजयी झालो आहे. त्यामुळे त्यांनाच बोलण्यास कोणताही विषय नसल्यामुळे ते विठ्ठल कारखान्यावर व माझ्या वैयक्तिक टीका करत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीची आहे. यामुळे निवडणुकीविषयी त्यांनी बोलावे विकासावर बोलावे असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारांना सोलापूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे खंबीरपणे उभे राहावे विरोधकांच्या भूलथापाला पडी बळी पडू नका असे आवाहन यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारआणि आमदार अभिजीत पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.