*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनीही केली उमेदवारीची मागणी*  *पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून तुतारीसाठी मागणी* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे  यांनीही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.


  पुणे येथील मार्केट यार्ड निसर्ग मंगल कार्यालयमध्ये आज मंगळवारी अनेक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नागेशदादा फाटे यांनीही अनेक उमेदवारां बरोबर आपलीही मागणी केली आहे.
   वरील ठिकाणी दुपारी तीन ते सायंकाळी चार या वेळेत विविध मतदारसंघातील  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, पंढरपूर शहराचे नगराध्यक्ष साधनाताई भोसले, माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, पंढरपूर शहर  अध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीपदादा मांडवे, मंगळवेढा शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, रतनचंद शहा बँकेचे  चेअरमन  राहुल शहा, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव देशमुख आदींनी उमेदवारीची मागणी केली आहे.
    आज मंगळवारी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळी अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत पाटील, माजी आमदार जयसिंग गायकवाड, आमदार रोहित  पवार, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे निरीक्षक चंद्रशेखर माने, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.