*सोलापूर जिल्ह्यातील आठ मतदार संघ रासप लढविणार*  *पंढरीतील बैठकीत सर्वानुमते निर्धार* 

*सोलापूर जिल्ह्यातील आठ मतदार संघ रासप लढविणार*   *पंढरीतील बैठकीत सर्वानुमते निर्धार* 

पंढरपूर/प्रतिनिधी 
 रासपच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी राज्यात सुरु आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी यांची शनिवारी पंढरपूर येथे बैठक पार पडली असून यामध्ये आठ विधानसभा मतदार संघात रासप स्वतंत्र्य उमेदवार देणार असून स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पंढरीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोलापूर जिल्हा आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तानाजी शिंगाडे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रीय समाज पक्षाचे सुरवातीपासूनच काम करणारे प्रवीण तरंगे व शेंडगे यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कोषाध्यक्ष महाळाप्पा खांडेकर यांनी केले.   
     पश्चिम महाराष्ट्र नूतन संपर्क प्रमुख तानाजी  शिंगाडे, नूतन जिल्हा अध्यक्ष विकास  आलदर,व रणजित सुळ यांचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अध्यक्ष रणजीत  सुळ यांनी पुणे येथे झालेल्या राज्याच्या बैठकीत जो निर्णय झाला. याबाबत माहिती दिली.महाराष्ट्र राज्यात एकूण 104 विधानसभा मतदार संघात  राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार असल्याचे सांगितले. यासाठी सोलापूर जिल्हा कुठेही मागे न पडता  आठ मतदार संघात आपण लढणार आहोत.ही निवडणूक लढविण्याची रणनीती आखण्यात आली. 
     या बैठकीत इतर विषयावर विचार मंथन करण्यात आले.यानंतर सर्व पदाधिकारी ओळख आणि त्यांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी विषयी मनोगत व्यक्त केले. 

     महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कविता माने  यांनी आपल्या मनोगतात महिलाना सहभागी करून घेण्याच्या दृष्ठिने विचार मांडले. सर्वांच्या सहकार्याने काम करू. असे आश्वासनही दिले.

      किरण गोपने यांनीही कार्यकर्त्याने आगामी काळात संघटना वाढीचे दृष्ठिने काम कसे करावे आणि येणाऱ्या अडचणीला कसे तोंड द्यावे याविषयी मार्गदर्शन केले. 
 पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज  देवकते यांनी आगामी विधानसभा कश्या पद्धतीने लढता येतील. आणि भविष्यात काय नियोजन करता येईल. याबाबत एकास एक या पद्धतीने उमेदवार कसे देता येतील. या विषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी शिंगाडे यांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटन कसे मजबूत होते. याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा लवटे सर यांनी केले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख गोरख वाकडे,युवक जिल्हा अध्यक्ष दामाजी मेटकरी, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन मेटकरी, जिल्हा कोषाध्यक्ष महाळाप्पा खांडेकर सर, जिल्हा सरचिटणीस अभिमान काळे, जिल्हा सचिव अरुण वैद्य, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते,युवक संपर्क प्रमुख संतोष मासाळ,पंढरपूर तालुका अध्यक्ष संजय लवटे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे, मोहोळ तालुका अध्यक्ष अनिल महानोर,तसेच नूतन निवड झालेले पदाधिकारी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.